7th Pay Commission: एक जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनांझा! होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 12:31 PM2021-07-28T12:31:35+5:302021-07-28T12:44:33+5:30

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने आता एचआरएदेखील वाढवावा लागत आहे. (7th pay commission)

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच DA आणि DR या महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच बरोब आणखी एक मोठी बातमी म्हणजे, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाऊस रेंट अलाउन्स (HRA) देखील वाढवला आहे. हाही 1 जुलैपासूनच लागू होईल. म्हणजेच जुलै 2021पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना डबल बोनांझा मिळणार आहे. (7th pay commission central govt employees double bonanza HRA revise)

महागाई भत्त्यात मोठी वाढ - या महिन्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता 17 टक्के वाढवून 28 टक्के केला आहे. नवा दर 1 जुलै 2021पासून लागू केला जाईल.

यानंतर, केंद्र सरकारने हाऊस रेंट अलाउंस (HRA)देखील वाढविला आहे. सरकारने याच महिन्याच्या सुरुवातीला या आदेशाला मंजुरी दिली आहे.

...म्हणून वाढवण्या आला एचआरए - केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने आता एचआरएदेखील वाढवावा लागत आहे.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शहरानुसार, 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्क्यांच्या हिशेबाने एचआरए मिळेल. यासाठी शहरांची X, Y आणि Z क्लासमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के एचआरए मिळायचा

7th Pay Commission लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने HRAची पद्धत बदलली होती. याच्या 3 कॅटेगिरी X,Y आणि Z तयार करण्यात आल्या होत्या. यानुसार, 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के HRA मिळेल, असे निश्चित झाले होते.

तत्पूर्वी, जेव्हा DA 25 टक्क्यांपेक्षा पुढे जाईल, तेव्हा त्यात सुधारणा केली जाईल, असेही केंद्र सरकारने म्हटले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English