7th Pay Commission: सरकारी कर्मचारी होणार मालामाल! एवढ्या हजार रुपयांनी होणार पगारात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 12:27 PM2023-02-25T12:27:14+5:302023-02-25T12:31:44+5:30

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या डीए वाढीबाबत १ मार्च रोजी निर्णय होणार आहे.

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या डीए वाढीबाबत १ मार्च रोजी निर्णय होणार आहे, १ मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते.

या बैठकीत जानेवारी २०२३ च्या वाढीव DA वाढीला मान्यता दिली जाऊ शकते. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यात २ महिन्यांच्या थकबाकीचे पैसेही येऊ शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा १०,५०० रुपयांची वाढ होऊ शकते.

जानेवारी २०२३ मध्ये सरकार कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने डीए देऊ शकते. कॅबिनेट बैठकीत सरकार वाढीव डीए जाहीर करू शकते. AICPI डेटावरून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो.

५२ लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना ३८ टक्के दराने डीए मिळत आहे. यावेळी सरकारने ४ टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्ता मिळेल.

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचार्‍यांच्या मूळ पगारावर डीएची गणना केली जाते. जर कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार २५,००० रुपये असेल तर त्याच्या पगारात ४२% DA नुसार दरमहा १०,५०० रुपयांची वाढ होईल.

दुसरीकडे, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८,००० रुपये असेल तर त्याच्या पगारात दरमहा ७५६० रुपयांची वाढ होईल.

कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्यास, महागाई भत्ता ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. जुलै २०२२ मध्येही सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ केली होती.

लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए आणि डीआर वाढीचा फायदा होईल.