ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली

साराने UCL च्या मेडिसिन विभागातून, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण मध्ये, डिस्टिंक्शनसह मास्टर्स पूर्ण केल्याची आनंदाची बातमी सांगितली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 06:39 PM2024-05-24T18:39:22+5:302024-05-24T18:40:04+5:30

whatsapp join usJoin us
Sara Tendulkar completed her Masters with Distinction from UCL’s Dept of Medicine, in Clinical & Public Health Nutrition, Sachin Tendulkar post viral | ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली

ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याने लेक साराने UCL च्या मेडिसिन विभागातून, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण मध्ये, डिस्टिंक्शनसह मास्टर्स पूर्ण केल्याची आनंदाची बातमी सांगितली. साराने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर बायोमेडिकल सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स केले आहे.  


साराला तरुण वयातच अन्न आणि त्याच्या वैज्ञानिक पैलूंमध्ये रस निर्माण झाला, ज्यामुळे तिने  मेडिसिन विभागातून, क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण या विषयाचे शिक्षण घेतले. सचिनने आज सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी पोस्ट केली. ''तो एक सुंदर दिवस होता. ज्या दिवशी आमच्या मुलीने UCL च्या मेडिसिन विभागातून क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य पोषण मध्ये, डिस्टिंक्शनसह मास्टर्स पूर्ण केले. पालक या नात्याने, इथवर पोहोचण्यासाठी तू वर्षानुवर्षे केलेले सर्व काम पाहिल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे सोपे नाही. भविष्यात तू अशीच स्वप्न पूर्ण करत राहा आणि ते तू करशील याची आम्हाला खात्री आहे. ढेर 'सारा' प्यार!''असे सचिनने लिहिले. 


साराला मॉडलिंगचीही आवड आहे. तिने अजियो लक्सच्या जाहिरातीमध्ये मॉडेल म्हणून पदार्पण केले आणि तिने फॅशन आणि मनोरंजन उद्योगात प्रवेश केला. सारा सोशल मीडियावर सक्रीय असते आणि तिचे Instagram वर ५.८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.  

Web Title: Sara Tendulkar completed her Masters with Distinction from UCL’s Dept of Medicine, in Clinical & Public Health Nutrition, Sachin Tendulkar post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.