साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 08:57 IST
1 / 15Weekly Horoscope: वर्ष २०२५ ला निरोप देणाऱ्या आणि नूतन वर्ष २०२६ चे स्वागत करणाऱ्या या सप्ताहात दि. २९ डिसेंबर रोजी बुधाचा धनु राशीत प्रवेश होत आहे. ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, केतु सिंह राशीत, बुध वृश्चिक राशीत आहे. दि. २९ रोजी बुध धनु राशीत जाईल. तेथे त्याची युती रवि, मंगळ आणि शुक्र यांच्याशी होईल. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून राहील. २९ डिसेंबर २०२५ रोजी पंचक समाप्त होत आहे. दि. ३० डिसेंबर रोजी २०२५ मधील अखेरची पुत्रदा (स्मार्त) एकादशी आहे. दि. ३१ डिसेंबर रोजी २०२५ मधील शेवटची भागवत एकादशी आहे. नववर्ष दिनी दि. १ जानेवारी २०२६ रोजी प्रदोष आहे. दि. ३ रोजी शाकंभरी पौर्णिमा आहे. माघ स्नान प्रारंभ होईल. शाकंभरी देवी उत्सवास प्रारंभ होत आहे. आज पंचक आहे. 3 / 15गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत बुध ग्रहाचा प्रवेश झाल्यानंतर या राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. तसेच बुधादित्य, आदित्य मंगल, शुक्रादित्य, लक्ष्मी नारायण असे अद्भूत शुभ राजयोग जुळून येत आहे. चतुर्ग्रही ४ राजयोगांमध्ये नववर्षाची सुरुवात कोणत्या राशींना कशी ठरू शकेल, कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया...4 / 15मेष: या आठवड्यात आहारात संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती हवी असल्यास खूप मेहनत करावी लागेल; सातत्य ठेवल्यास इच्छित लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अतिशय चांगला असून कामात लक्ष केंद्रित केल्यास वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. प्रेमसंबंधात काही गोंधळ किंवा तणाव संभवतो; मात्र एखादा जुना साथी पुन्हा संपर्क करू शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून आनंददायी बातमी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या खर्च वाढतील व लाभ उशिरा मिळेल. घराच्या दुरुस्ती, सजावटी किंवा वस्तू खरेदीवर अधिक पैसा जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवावे, कारण मन विचलित होण्याची शक्यता जास्त. स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी आठवडा अनुकूल आहे.5 / 15वृषभ: या आठवड्यात आहारात काळजी आवश्यक. आठवड्याच्या शेवटी मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात एखाद्या नवीन व्यक्तीशी भेट होण्याचे योग आहेत. वैवाहिक आयुष्यात जुन्या गोष्टींना उजाळा दिल्यास वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. व्यवसायात जास्त मेहनत आणि संघर्षानंतरच यश मिळेल. नोकरीत अत्यंत सावध राहा; चुकीचे बोलल्यास वाद निर्माण होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या घर, प्लॉट किंवा नवा फ्लॅट खरेदीवर खर्च होण्याची शक्यता आहे. लक्झरी वस्तूंवरही पैसा खर्च होईल. शेअर बाजारातून लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होताना सावधानता बाळगावी; पण प्रयत्नांमुळे यशाची शक्यता आहे.6 / 15मिथुन: आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. बाहेरचे अन्न किंवा दूषित पाणी घेतल्यास इन्फेक्शन किंवा पचनाचे त्रास वाढू शकतात. प्रेमसंबंधात विचित्र गैरसमज निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे नात्यात तणाव येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जुन्या मतभेदांवर पडदा टाकून नवा प्रारंभ करता येईल; बाहेरील लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. व्यवसायात नव्या संपर्कांमुळे उत्तम लाभ मिळण्याची शक्यता, तर नोकरीसाठी जास्त प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक स्थितीत भाग्याची साथ मिळेल आणि गुंतवणुकीतून चांगले परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा तणावपूर्ण असून अभ्यासात लक्ष कमी राहील. विषय बदलण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी. विरोधक लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे फोकस राखणे आवश्यक.7 / 15कर्क: या आठवड्यात आरोग्य संतुलित राहील; आराम मिळेल. प्रेमसंबंधात जोश आणि उत्साह वाढेल; साथीदारासोबत सहल करण्याचे योग आहेत. वैवाहिक नात्यात मात्र किरकोळ वाद होऊ शकतो, परंतु संवादाने परिस्थिती सुधारू शकाल. व्यवसायात योग्य वेळी गुंतवणूक केली तर उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयीन पॉलिटिक्सपासून दूर राहणे आवश्यक; नोकरी बदलण्याचा विचार सध्या टाळावा. आर्थिकदृष्ट्या आठवडा खर्चिक असून प्रवास, नूतनीकरण किंवा आवश्यक कामांवर जास्त पैसा जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक मेहनत करणे आवश्यक असून यशासाठी सातत्य गरजेचे आहे.8 / 15सिंह: या आठवड्यात जुन्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळू शकतो. प्रेमसंबंधात एखाद्या किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी गैरसमज निर्माण होऊ शकतो; मात्र दुसरीकडे काही जण पार्टनरची घरच्यांशी ओळख करून देऊ शकतात. वैवाहिक जीवन समाधानकारक राहील आणि जोडीदारासोबत सुंदर क्षण अनुभवता येतील. व्यवसायात नवीन शाखा, दुकान किंवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी मोठा खर्च होऊ शकतो; रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे योग अनुकूल. नोकरी करणाऱ्यांना जुन्या कार्यस्थळावरून पुन्हा ऑफर येऊ शकते, परंतु निर्णय विचारपूर्वक घ्या. एकूणच मेहनतीची मागणी करणारा आठवडा असून योग्य लक्ष व सावधगिरी बाळगल्यास लाभ नक्की.9 / 15कन्या: या आठवड्यात जुने त्रास काही अंशी कमी होतील. प्रेमसंबंधात घाईघाईत बोलू नका; नातं टिकवायचे असेल तर अहंकार बाजूला ठेवणे महत्त्वाचे. वैवाहिक जीवनात काहीसा गोंधळ किंवा गैरसमज राहू शकतो; कुटुंबातील मोठ्यांचं मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. व्यवसायात नवा उपक्रम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही, तोट्याची शक्यता. नोकरीत वरिष्ठांशी वाद टाळा; संयमाने काम करा. आर्थिकदृष्ट्या अनावश्यक खर्च वाढतील, विशेषतः मित्रांच्या संगतीत किंवा नवीन उपकरणांवर. पैशांबाबत वाद निर्माण होऊ नयेत म्हणून सावध राहा. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून भटकू शकते; चुकीच्या मित्रांपासून अंतर ठेवणे उपयुक्त. महत्त्वाची माहिती कोणासोबतही उघडपणे शेअर करू नका. एकूणच, सावधगिरी आणि संयम आवश्यक.10 / 15तूळ: आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आहार, झोप आणि प्रवास याबाबत काळजी घ्यावी. प्रेमसंबंधात उत्साह कमी राहील; पार्टनरशी पूर्ण वेळ न घालवल्यास तणाव वाढू शकतो. वैवाहिक जीवनात अहंकार किंवा कटू बोलण्यामुळे नात्यात तडे येऊ शकतात, त्यामुळे शांतपणे संवाद साधा. व्यवसायात मनासारखा प्रोजेक्ट मिळू शकतो; परंतु, त्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी आठवडा फायदेशीर; योग्य संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक करताना सावधानी आवश्यक, अनुभवी व्यक्तीचा सल्ला लाभदायक ठरेल. शेअर बाजारातून फायदा होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी सोशल मीडियापासून दूर रहावे; प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश मिळण्याचे योग उत्तम.11 / 15वृश्चिक: या आठवड्यात मॉर्निंग वॉक, योग आणि पुरेशी विश्रांती उपयुक्त ठरेल. व्यवसायात मोठी डील मिळण्याची शक्यता असून नवीन संपर्क तयार होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा तणावपूर्ण; कामाचा भार वाढेल. प्रेमसंबंध अत्यंत रोमँटिक आणि आनंददायी; साथीदारासोबत सुंदर क्षण अनुभवता येतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि जिव्हाळा वाढेल; एखादा कौटुंबिक कार्यक्रमही करता येईल. आर्थिकदृष्ट्या लोनची परतफेड करण्यासाठी बचतीचा वापर करावा लागू शकतो. गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात कमी लागेल; भ्रम किंवा संभ्रम वाढू शकतो. स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्यांसाठी वेळ चांगला असून एकाग्रता ठेवल्यास यश मिळू शकते.12 / 15धनु: या आठवड्यात तळलेले पदार्थ किंवा जास्त मसालेदार अन्नामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील; विस्तारासाठी चांगले योग. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल असून उत्तम ऑफर्स येऊ शकतात. प्रेमसंबंधात संशय आणि तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पारदर्शक संवाद गरजेचा. वैवाहिक जीवनात काही मतभेद होऊ शकतात आणि जोडीदाराशी ताण वाढण्याची शक्यता. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापासून भटकू शकते; मात्र नवीन संशोधन किंवा प्रोजेक्टसाठी हा आठवडा उत्तम. स्पर्धा परीक्षेसाठीही प्रयत्न वाढवणे उपयुक्त ठरेल. एकूणच, संयम आणि जबाबदारीने कृती केल्यास आठवडा लाभदायक.13 / 15मकर: व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर सध्या थोडा वेळ थांबणे योग्य. करिअरमध्ये तणाव वाढू शकतो, पण नवीन नोकरीच्या संधी उत्तम मिळतील. प्रेमसंबंध ऊर्जावान, उत्साही राहतील; परंतु अहंकार बाजूला ठेवणे अत्यंत आवश्यक. वैवाहिक जीवन सौहार्दपूर्ण असून जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. आर्थिक स्थिती मात्र अस्थिर, फाजील खर्चामुळे बचत कमी होईल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस न करता सातत्याने तयारी करावी. एकूणच संतुलन आणि नियंत्रण आवश्यक.14 / 15कुंभ: या आठवड्यात उत्साह आणि ऊर्जा जाणवेल; परंतु प्रवास करताना सुरक्षिततेचे भान राखा. व्यवसायात सातत्य आणि मेहनत आवश्यक; बँकिंग, फायनान्स किंवा कागदी कामांत फायदा मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. प्रेमसंबंधात किरकोळ वाद निर्माण होऊ शकतो ज्यामुळे दूरावा येऊ शकतो; शांतता राखा. वैवाहिक जीवनात सौहार्द दिसेल आणि जोडीदारासोबत नवीन उपक्रम सुरू करण्याचे योग. आर्थिकदृष्ट्या आठवडा खर्चिक; अनावश्यक सल्ल्यावर विश्वास ठेवून पैसे खर्च करू नका. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात लागेल; मात्र सोशल मीडिया व चुकीच्या संगतीपासून दूर राहावे. एकंदरीत, मेहनत व सतर्कता महत्त्वाची.15 / 15मीन: या आठवड्यात आहार हलका ठेवा आणि तेलकट पदार्थ टाळा. प्रेमसंबंधात बळकटपणा दिसेल; एकतर्फी प्रेम व्यक्त करण्यासाठीही वेळ अनुकूल. वैवाहिक नात्यात सौहार्द राहील, जोडीदाराशी संवादातून नातं अधिक दृढ होईल. आर्थिकदृष्ट्या खर्च वाढतील; वाहन, घर किंवा मोठ्या वस्तूंवर पैसा खर्च होऊ शकतो. व्यवसायात योग्य वेळी गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना उत्तम संधी मिळू शकते; वरिष्ठांशी नाते सौहार्दाने ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत लक्ष केंद्रित ठेवावे; चुकीची संगत टाळल्यास चांगले परिणाम दिसतील. एकूणच, नियोजन आणि शांतता यामुळे आठवडा चांगला जाईल.