Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २३ एप्रिल २०२३ ते २९ एप्रिल २०२३: ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीत वर्चस्व; मान-सन्मान अन् भाग्याचा काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 11:20 IST
1 / 15म्हणता म्हणता एप्रिल महिना अखेरच्या टप्प्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. अस्तंगत असलेला गुरु ग्रह उदय होणार आहे. तसेच गुरु पुष्यामृत योगही जुळून येत आहे. तसेच या सप्ताहात कुठलाही राशीपालट नाही. 2 / 15एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातील ग्रहस्थिती अशी- रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल मेषेत आहेत. शुक्र वृषभेत, मंगळ मिथुनेत, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत तर नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून राहील. 3 / 15रविवारी विनायकी चतुर्थी, मंगळवारी आदि शंकराचार्य जयंती आहे. बुधवारपासून श्री नृसिंह नवरात्र सुरु होत आहेत. गुरुवारी गुरुपुष्यामृत आहे. एकूणच ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे साप्ताहिक राशीभविष्य... 4 / 15मेष: सप्ताह तुम्हाला विविध प्रकारचे लाभ देणारा ठरेल. मनात आत्मविश्वास निर्माण होईल. नवीन महत्त्वाची माहिती कळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. तुमच्या मनातील नैराश्य निघून जाईल. ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पार पाडाल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. जवळचे मित्र, नातेवाईक यांच्या भेटी होतील. व्यवसायात यशस्वी भरारी घ्याल. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.5 / 15वृषभ: मनात आनंदी विचार राहतील. किरकोळ स्वरुपाच्या अडचणी दूर होतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगली स्थळे चालून येतील. भेटवस्तू प्राप्त होतील. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. समारंभात सहभागी व्हाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. जवळच्या सहलीला जाऊन याल. व्यवसायात भरभराट होईल. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.6 / 15मिथुन: या सप्ताहात ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. मनात प्रसन्न विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक लाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अचानक चांगल्या संधी मिळतील. वडीलधाऱ्या मंडळींची मदत मिळेल, वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल. कार्यालयात तुमचे महत्त्व वाढेल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. प्रेमात सफलता मिळेल. एखाद्या सौद्यात मोठा फायदा होऊ शकतो. मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. टीप: मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.7 / 15कर्क: आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. मात्र आलेला पैसा खरेदीत खर्च करून टाकाल. त्यामुळे बचतीचे प्रमाण कमी राहील. मित्र, सहकाऱ्यांची चांगली साथ तुम्हाला मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मात्र अधूनमधून त्यात काही अडचणी येतील. कामाची शैली सुधारणे आणि संयम या जोरावर आपण यशस्वी व्हाल. कामे झालीच पाहिजेत असा अट्टहास करू नका. जीवनसाथीशी काही कारणाने गैरसमज होतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. टीप: रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.8 / 15सिंह: ग्रहमानाच्या अनुकूलतेचा वेळीच फायदा घ्या. आळस झटकून कामे पूर्ण करा. तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील, अशी स्थिती राहील. अडचणी दूर होतील. अचानक चांगल्या संधी मिळतील. महत्त्वाचे निरोप येतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसेल. नोकरीत अनुकूल बदल होतील. तुमच्या बोलण्याला महत्त्व राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.9 / 15कन्या: या सप्ताहात भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. पाहुणे मंडळी येतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. मुलांची प्रगती होईल. नोकरीत अनपेक्षित बदल होतील. चांगल्या संधी मिळतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. काही अडचणी आल्या तरी संयम सोडू नका. अडचणी दूर होतील. टीप: रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.10 / 15तूळ: सप्ताहाच्या सुरुवातीला सावध राहा. काही अडचणी येऊ शकतात. मात्र संयमाने वागा. त्यातून मार्ग निघेल आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. वाहन जपून चालवा. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडून येईल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. घरी पाहुणे मंडळी येतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. मुलांची प्रगती कळेल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल. टीप : मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार चांगले दिवस.11 / 15वृश्चिक: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही चांगल्या घटना घडतील, तर काही मनाविरुद्ध. तरीही संयम सोडू नका. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. प्रेमात सफलता मिळेल. विवाहेच्छूंसाठी अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात भरभराट होईल. अचानक धनलाभ होईल. मुलांना योग्य संधी मिळतील. नोकरीत कामाचा ताण राहील. काही नवीन कामे अंगावर पडतील. घरी पाहुणे मंडळी येतील. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. टीप: रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.12 / 15धनु: थोडे थोडे गोड अनुभव येतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. मात्र आपण त्यांना नामोहरम कराल. व्यवसायात मोठ्या संधी मिळतील. बाजारपेठेचा विचार करून गुंतवणूक कराल. त्यात तुमचा फायदा होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. कामे आटोक्यात येतील. टीप: सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.13 / 15मकर: नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. अनुकूल परिस्थिती राहील. मात्र आर्थिक उलाढाली जपून करा. बाजारपेठेचे अंदाज चुकू शकतात. फार मोठी जोखीम घेणे टाळा. कलाकारांना प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. टीप: रविवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.14 / 15कुंभ: व्यवसायात भरभराट होईल. जवळचे नातेवाईक, मित्र- मैत्रिणी यांची भेट होईल. घरात एखाद्या समारंभाचे आयोजन केले जाईल. पाहुणे मंडळी येतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना चांगला काळ आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. तुमचा गौरव केला जाईल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. कामाचे स्वरूप बदलेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.15 / 15मीन: या सप्ताहात आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र फार मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. जवळच्या प्रवासाचे योग येतील. मित्र, नातेवाईक यांच्या समवेत सहलीला जाऊन याल. व्यवसायात यशस्वी भरारी घ्याल. नोकरीत नवीन संधी मिळून फायदा होईल. घरात कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने पाहुण्यारावळ्यांची ये-जा राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. टीप: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)