हरी-हर कृपा-लाभ: ५ राशींना २ राजयोग भरघोस देतील, यश-प्रगती संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ-समृद्धी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 07:07 IST
1 / 15दि. १४ रोजी रवि कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. अन्य कुठलेही ग्रहपालट नाहीत. ग्रहस्थिती अशी की, हर्षल मेष राशीत, गुरू वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत आहेत. रवि आणि शनि कुंभ राशीत आहेत. शुक्रवारी रवि मीन राशीत जाईल. तेथे त्याची युती राहु, नेपच्यून, बुध आणि शुक्र यांच्याशी होईल. 2 / 15१५ मार्च २०२५ रोजी बुध वक्री होत आहे. चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीतून होईल. सोमवारी आमलकी एकादशी, तर मंगळवारी प्रदोष आहे. गुरुवारी हुताशनी पौर्णिमा (होळी) आहे. शुक्रवारी धूलिवंदन, कर आहे. शनिवारी वसंतोत्सवारंभ आहे. या कालावधीत हरी-हर पूजन करून कृपा मिळवण्याची उत्तम संधी आहे. 3 / 15तसेच सूर्याचा मीन राशीत होत असलेला प्रवेश अनेक बाबतीत उजवा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशानंतर बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन या ग्रहांशी युती होईल. तसेच बुधादित्य, शुक्रादित्य असे राजयोग जुळून येतील. एकूणच हा काळ कोणत्या राशींना यश, प्रगती, अपार कृपा-लाभाचा जाऊ शकेल, ते जाणून घेऊया...4 / 15मेष: प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांना मेहनत वाढवावी लागू शकते. तरच ते व्यवसायात यशस्वी होऊ शकतील. नोकरी करणाऱ्यांनी नोकरीच्या बाबतीत कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये. निर्णय विचारपूर्वकच घ्यावा. मेहनत करत राहावी. सावध राहावे. विवाहितांच्या नात्यात एखाद्या गैरसमजामुळे कटुता येण्याची संभावना असल्याने त्यांनी काळजी घ्यावी. जर एखादे कर्ज घ्यायचे असेल तर ते अत्यंत सावध राहूनच घ्यावे.5 / 15वृषभ: व्यापाऱ्यांना व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. असे केल्यासच ते यशस्वी होऊ शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर वरिष्ठ खुष होतील. असे असले तरी नोकरीतील कोणत्याही प्रकारचा बदल करण्यास आठवडा अनुकूल नाही. तेव्हा जेथे आहात तेथेच काम करत राहणे हितावह होईल. विचारपूर्वक निर्णय घेणे उचित ठरेल. वैवाहिक जीवनासाठी अनुकूल आहे. जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. दोघांतील प्रेम वृद्धिंगत होईल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी कालावधी अनुकूल आहे. यशस्वी होऊ शकतील.6 / 15मिथुन: ज्या व्यक्ती शिक्षण, मॅनेजमेंट, अर्थकारण, माहिती तंत्रज्ञान, सल्लागार इत्यादी विषयांशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर आहे. विवाहितांच्या जीवनात जवळीक वाढेल. घराचे नूतनीकरण किंवा वाहनाची दुरुस्तीस पैसा खर्च करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. ते जितकी जास्त मेहनत करतील तितकेच ते पुढे जाऊ शकतील. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अनुकूलता लाभू शकेल. एखाद्या व्यक्तीस मदत करावी लागू शकते.7 / 15कर्क: व्यापारी त्यांच्या व्यापाराशी संबंधित निर्णय घेताना त्रस्त होऊ शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. नोकरी करणाऱ्यांनी नोकरीत केलेला बदल हितावह होईल. तेथे त्यांना जास्त पगार मिळू शकतो. वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा जास्त चांगले असेल. वैवाहिक जोडीदाराशी मोकळेपणाने बोलू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी जास्त पैसा खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनात अपेक्षित परिणाम मिळू शकतात.8 / 15सिंह: नोकरी करणाऱ्यांसाठी जास्त मेहनत करण्याचा काळ आहे. व्यापाऱ्यांना अनपेक्षितपणे एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. सावध राहावे लागेल. अहंकारामुळे काही वाद संभवतात. जर आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती दीर्घ मुदतीसाठी करावी. त्यामुळे भविष्यात चांगला परतावा मिळू शकेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य परिणाम मिळू शकतील.9 / 15कन्या: कारकीर्द व व्यवसायासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. व्यापारानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांना सकारात्मकता लाभू शकेल. नोकरीत बदल करावयाचा असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. परंतु सध्या नोकरी करत असलेल्या ठिकाणी स्थिती उंचावून दाखवावी. वैवाहिक जीवनासाठी काळ अनुकूल आहे. वैवाहिक संबंधात ज्या काही समस्या येत होत्या त्या परस्पर चर्चेने दूर केल्या जाऊ शकतात.10 / 15तूळ: आहारावर नियंत्रण ठेवल्यास शरीराचा तजेला टिकून राहील. व्यापाऱ्यांनी जुना व्यवसाय पुन्हा सुरु करण्यास हरकत नाही. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. दुसऱ्या नोकरीचा शोध घेऊ शकतात. नात्यात दुरावा येऊ शकतो. एखाद्या गैरसमजामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती दीर्घ काळासाठी करावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात यशस्वी होण्यासाठी काही मित्रांची संगत सोडून द्यावी.11 / 15वृश्चिक: आगामी काळ चांगला आहे. व्यापारास अनुकूल आहे. व्यापारवृद्धीची चांगली संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. नवीन नोकरी मिळू शकते. सध्याच्या नोकरीत राजकारणापासून दूर राहावे. प्रेमात तिसऱ्या व्यक्तीच्या आगमनाने नात्यात दुरावा येऊ शकतो. विवाहितांनी जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. जर एखादी जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी अनुकूलता लाभू शकेल. विद्यार्थी अधिकांश वेळ मित्रांच्या सहवासात वाया घालवून ध्येयापासून दूर जाऊ शकतात. त्याचा नकारात्मक परिणाम अध्ययनावर होऊ शकतो.12 / 15धनु: व्यापाऱ्यांनी उत्साहात व जोमाने कामे केली तरच त्यांच्या व्यापार चांगला होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी अनुकूलता लाभू शकेल. सेल्स, मार्केटिंग इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सकारात्मकता मिळू शकेल. जितकी जास्त धावपळ कराल तितका अधिक फायदा होईल. प्रेम जीवनात गैरसमजामुळे भ्रम निर्माण होऊ शकतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदारासह एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. प्राप्ती कमी झाल्याने आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा खर्चांवर नियंत्रण ठेवावे.13 / 15मकर: आगामी काळ अत्यंत अनुकूल आहे. व्यापारानिमित्त एखादा प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे थकवा येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते. सध्याच्या नोकरीपेक्षा जास्त चांगली असू शकेल. प्रेम जीवन सुखद होईल. प्रेमिकेसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. वैवाहिक संबंध दृढ होतील. वैवाहिक जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊन आपले मन मोकळे करू शकता. घरात वायफळ खर्च झाल्याने मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल.14 / 15कुंभ: नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालावधी चांगला आहे. सध्या नोकरी बदलू नये. फसवणूक होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी काळ जास्त कष्ट करण्याचा आहे. वैवाहिक जीवनात अनुकूलता लाभू शकेल. वैवाहिक जोडीदारासह एखादे नवीन कार्य सुरु करू शकता. धार्मिक कार्यासाठी भरपूर पैसा खर्च कराल. विद्यार्थ्यांना सकारात्मकता मिळू शकेल. मित्र, सामाजिक माध्यमे इत्यादीत जास्त वेळ घालवल्याने एखादी मौल्यवान संधी हातून निसटू शकते.15 / 15मीन: आगामी काळ चांगला आहे. स्फूर्तिवान व ऊर्जावान राहाल. व्यवसाय उत्तम चालेल. त्यात उन्नती होऊ शकते. विवाहितांसाठी काळ अनुकूल आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. जोडीदारासह एखाद्या नवीन कार्याचा शुभारंभ करू शकतात. प्रेम जीवन सुखद होईल. प्रेमिकेशी एखाद्या कारणाने जर काही वाद झाला असेल तर तो आता संपुष्टात येऊ शकतो. जर एखाद्या बँकेकडून कर्ज घेऊ इच्छित असाल तर यशस्वी होऊ शकता.