1 / 15मे महिन्याच्या या आठवड्यात नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ मिथुन राशीतून कर्क राशीत विराजमान होत आहे. तर, ग्रहस्थिती अशी असेल - रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल मेषेत शुक्र आणि मंगळ मिथुनेत, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, रानी कुंभेत तर नेपच्यून मीन राशीत आहेत. चंद्र भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीतून राहील.2 / 15सोमवारी संकष्ट चतुर्थी आहे. या आठवड्याच्या उत्तरार्धात पंचक लागणार आहे. याशिवाय महाराणा प्रताप जयंती आहे. कालाष्टमी, धनिष्ठानवकारंभ आहे. संत चोखामेळा पुण्यतिथी, तुंबरू जयंती आहे. याशिवाय बुध मेष राशीत मार्गी होणार आहे. तसेच बुधाचा उदय होणार आहे. 3 / 15एकंदरीत ग्रहमान पाहता, आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतील? कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगावी? या आठवड्यात कोणत्या राशींना कोणते दिवस चांगले ठरू शकतील? ते जाणून घेऊया...4 / 15मेष: विविध प्रकारचे लाभ देणारा काळ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला थोड्या अडचणी येतील. उष्णतेचे विकार होऊ शकतात. मात्र थोडा आराम व योग्य आहार घ्या. भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यात ताण राहील. फायदे पण होतील. व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.5 / 15वृषभ: मनात उत्साह राहील. चांगल्या बातम्या कळतील. जीवनसाथीची चांगली साथ तुम्हाला मिळेल. जीवनसाथीला एखादी भेटवस्तू देण्यास हरकत नाही. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. घरात मिठाई आणली जाईल. पाहुणे येतील. प्रवासात सतर्क राहा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नातेवाइकांच्या खुशखबरी कळतील. लोक तुमची प्रशंसा करतील. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.6 / 15मिथुन: सप्ताहाच्या सुरुवातीला काही अडचणी असतील. मात्र थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. अडचणी लवकरच दूर होतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. मात्र एखाद्या व्यवहारात फटका बसू शकतो. त्या दृष्टीने काळजी घ्या. फार मोठी जोखीम पत्करु नका, महत्त्वाच्या नोंदी ठेवण्यात आळस करू नका. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार, रविवार चांगले दिवस.7 / 15कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. जनसंपर्क चांगला राहील. नवीन ओळखी होतील. समाजात तुमचा गौरव केला जाईल. प्रसिद्धी, मानसन्मान प्राप्त होईल. व्यापार उद्योगात लाभ होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मनात काही शंका असतील. विरोधकांच्या कारवाया सुरु राहतील. पण नंतर त्या थंडावतील. चैनीवर पैसे खर्च केले जातील. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.8 / 15सिंह: या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुमचा गवगवा राहील. नवीन संधी मिळतील. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. जवळच्या लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. मुलांची प्रगती होईल. त्यांना अनुकूल वातावरण राहील. तुमच्या भूमिकेमुळे विरोधक रुष्ठ होतील. त्यांच्या कारवाया वाढतील. मात्र आपण संयम सोडू नका. आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वासाने कामे करत राहा. प्रलंबित कामे गती घेतील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.9 / 15कन्या: व्यवसायात सतत व्यस्त राहाल. मात्र भागीदारीचे व्यवहार जपून करा. मोठी गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. वित्तविषयक उलाढाली करताना कागदोपत्री करार नीट वाचून मगच सही करा. नोकरीत अनुकूल बदल होतील. चांगल्या घटना घडतील. लाभ होतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. पाहुणे मंडळी येतील. मुलांची काळजी घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.10 / 15तूळ: आपण हाती घेतल्या प्रकल्पात यश मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल. नोकरीत घटना, घडामोडी घडतील. त्यात तुमचा कामाचा ताण वाढेल. अनाहूत पाहुणे घरी येतील. वास्तूच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे लागेल. मुलांची काळजी घ्या. त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घ्या. तरुण- तरुणींनी प्रेम प्रकरणात वाहवत जाणे टाळावे. थोडे भानावर येऊन निर्णय घ्या. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.11 / 15वृश्चिक: आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. खाण्या पिण्याची चंगळ राहील. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मालमत्तेची खरेदी करण्याच्या दृष्टीने योजना आखल्या जातील. नोकरीत बदल होतील. कामाचा ताण राहील. थोडे मुत्सद्दीपणाने वागण्याची गरज आहे. गोडीगुलाबीने कामे करा. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.12 / 15धनु: सप्ताहाची सुरुवात थोडी चाचपडत होईल. मात्र, संयमाने वागल्यास अडचणी दूर होतील. ग्रहमानाची अनुकूलता मिळेल. विवाहेच्छूसाठी चांगला काळ आहे. चांगली स्थळे चालून येतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही. जीवनसाथीकडून भेटवस्तू मिळतील. व्यवसायात यशस्वी भरारी घ्याल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. भावंडांशी वाद टाळा. गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.13 / 15मकर: आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील. लोक तुमच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे इरादे वेळीच ओळखा आणि सावधपणे आपली कामे करा. महत्त्वाच्या कामात गोपनीयता बाळगण्याची गरज आहे. काही लोक तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील. नको त्या • बाबतीत खर्च करू नका. हितचिंतक कोण, हे लक्षात घेऊन त्यांचा सल्ला घ्या. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.14 / 15कुंभ: तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. लोक तुमची प्रशंसा करतील. मुलांची प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. पैसा मिळेल आणि खर्चही कराल. जुनी येणी वसूल होतील. जुन्या गुंतवणुकीचे फायदे होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. प्रगतीला पूरक वातावरण राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.15 / 15मीन: नोकरीत तुमचे पारडे जड राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. नवीन ओळखी होतील. नवीन संधी मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. घरात मंगलकार्य ठरू शकते. त्या निमित्ताने लोकांची ये जा चालू राहील. घरासाठी महागड्या वस्तू खरेदी कराल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. नशिबाचा कॉल तुमच्या बाजूने राहील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. मुलांचे कौतुक होईल. टीप- रविवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)