५६ दिवसांनी शुक्र मार्गी: १० राशींना लाभ, धनवृद्धी योग; गुंतवणुकीत नफा, अच्छे दिनची सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:43 AM2023-09-05T08:43:04+5:302023-09-05T08:54:22+5:30

शुक्र मार्गी झाल्याने अनेक राशींना लाभ मिळू शकतो. लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

सप्टेंबर महिना सुरू झाला असून, या महिन्यातही ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. तर काही ग्रहांच्या चलनस्थितीत बदल होणार आहे. यातील पहिला बदल म्हणजे सुमारे ५६ दिवस वक्री असलेला शुक्र आता मार्गी होणार आहे. सिंह राशीत असताना शुक्र वक्री झाला होता. वक्री असतानाच शुक्र अस्तंगत आणि उदय झाला होता.

वक्री चलनाने शुक्र कर्क राशीत विराजमान झाला होता. आता कर्क राशीत शुक्र मार्गी होत आहे. यानंतर आता ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र मार्गी झाल्याचा अनेकविध राशींना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

शुक्र मार्गी झाल्याचा जवळपास सर्वच राशींना लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींना यश, प्रगतीच्या संधी, धनलाभ योग, गुंतवणुकीतून फायदा, करिअरमध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. लक्ष्मी देवीची कृपा होऊ सकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: कुटुंब तसेच नातेवाईकांसोबतचे संबंध सुधारू शकतील. सढळ हस्ते पैसे खर्च करू शकाल. बिझनेस, व्यापारासाठी अधिक प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास लाभदायक ठरू शकतो. एखाद्या मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. अथक, कठोर परिश्रमानंतरच यश, प्रगती साध्य करू शकाल.

वृषभ: करिअरमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. नवीन संधी उपलब्ध होतील. करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ अतिशय शुभ आहे. यश मिळेल. कुटुंबातील सदस्य प्रत्येक बाबतीत साथ देतील. नोकरीच्या ठिकाणीही इतरांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल. अनुभवी कोणीतरी मदत करू शकेल. ऑफिसमध्ये मेहनत आणि काम बघता पदामध्ये वाढ होऊ शकते. व्यवसायात यशाचे दरवाजे उघडतील.

मिथुन: लाभाच्या संधी मिळतील. करिअरमध्ये काही विशेष बदल होतील ज्यामुळे फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत लाभ होईल. परिश्रम केल्याने फायदा होईल. महत्वाकांक्षा पूर्ण होतील. चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन मिळू शकते. नोकरीतही नवीन संधी मिळतील. परदेशात नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना काही मदत मिळू शकते.

कर्क: पूर्वीपेक्षा स्वतःकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात करावा. ज्या कामात गुंतवणूक कराल, त्यातून फायदा होईल. खर्च वाढेल. जोडीदारासोबतचे नाते प्रभावित होऊ शकते. कोणतेही काम संयम आणि संयमाने विचार करूनच केले पाहिजे.

सिंह: यश मिळेल. पैसा-अडकाची परिस्थिती सुधारेल. घरातील आवश्यक कामावर खर्च होतील. त्यात आनंदी असाल. यासोबतच उत्पन्न वाढेल. जोडीदारासोबत पूर्वीपेक्षा चांगले संबंध राहतील. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ऑफिसमधील लोक कामाचे कौतुक करतील. सुधारण्याच्या अनेक संधी असतील. त्यांची निवड काळजीपूर्वक करावी लागेल. कोणाच्या बोलण्यात अडकण्यापेक्षा स्वतः विचार करावा.

कन्या: आर्थिक लाभ होईल. कोणतेही जुने थकीत पैसे मिळू शकतात. व्यवसायात विशेष लाभ मिळेल. कामाचे कौतुक होईल. या दरम्यान नफा वाढेल. व्यवसायात नवीन कल्पनांवर काम कराल. काही ठोस निर्णय घ्याल जे यशस्वी ठरतील. भागीदारीत व्यवसाय केल्यास त्यात फायदा होईल. नवीन व्यवसाय हाती घेण्याचा विचार करू शकता. पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील. स्वतःचा व्यवसाय असेल तर तुमचे उत्पन्न वाढेल.

तूळ: शुक्राचे मार्गी होणे धनसंपत्तीदायक मानले जात आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. संपत्ती आणि सन्मान वाढेल. याद्वारे कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. कोणत्याही आऊटसोर्सिंग व्यवसायात सहभागी असाल तर फायदा होईल. परदेशातून पैसा मिळेल. लव्ह लाइफच्या बाबतीत, जोडीदारासोबत संबंध पूर्वीपेक्षा चांगले असतील.

वृश्चिक: कामाच्या ठिकाणी विशेष बदल होऊ शकतात. हे संक्रमण अनुकूल ठरेल. यावेळी मनोकामना पूर्ण होतील. अधिकार्‍यांकडून मान-सन्मान राहील. व्यवसाय करणार्‍यांना फायदा होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. पैसे कमवण्यासोबतच पूर्वीपेक्षा जास्त बचत करू शकाल.

धनु: करिअरशी संबंधित अडथळे दूर होतील. पुढे जाल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. या संधी काळजीपूर्वक निवडावे लागतील. अचानक पैसे मिळतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून उत्पन्न मिळेल. करिअरबाबत कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेऊ शकता. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा बजेट बिघडू शकते.

मकर: आगामी काळात भाग्याची भक्कम साथ मिळू शकेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. समृद्धी वाढेल. सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नवीन मित्र बनवण्याची संधी मिळू शकते. नशिबाने साथ दिल्यास करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. अनेक शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. त्यात नफा मिळेल. व्यवसायात फायदा होईल.

कुंभ: करिअरच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या निमित्ताने खूप प्रवास करावा लागू शकतो. पैसे कमवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. फायदा होईल. जोडीदारासोबत आनंदी जीवन जगाल.

मीन: लाभ मिळतील. सर्व कामे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण कराल. जुन्या योजनांचा फायदा होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. चांगला परतावा मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.