Vastu Shastra: पैशांचे पाकीट कधीही रिकामे होऊ नये वाटत असेल तर बाळगा 'या' चार वस्तू!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 02:57 PM2024-05-14T14:57:44+5:302024-05-14T15:04:50+5:30

Vastu Tips: वास्तुशास्त्रात अशा काही उपायांचे वर्णन करण्यात आले आहे, ज्याचे पालन केल्याने घरामध्ये धन-संपत्तीमध्ये अपार वाढ होते आणि सुख-समृद्धी येते. एवढेच नाही, तर काही वस्तू पर्समध्ये ठेवल्या तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आर्थिक संकटातून सुटका मिळते, असेही सांगितले आहे. चला तर पाहूया त्या उपयुक्त वस्तू कोणत्या!

बायकांच्या पर्सचा आकार मोठा असतो पण खर्च पुरुषांच्या छोट्याशा पर्समधून होतो, असे गमतीने म्हटले जाते. पण आता स्थिती तशी नाही. सगळेच कमावते झाले आहेत, सगळ्यांच्याच गरजा वाढल्या आहेत. पैसा कितीही कमावला तरी अपुराच पडत आहे. त्यामुळे स्त्री असो वा पुरुष वास्तू शास्त्राने सांगितलेल्या वस्तू पाकिटात ठेवणे हितावह ठरते.

तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवा. वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवण्यापूर्वी ते देवी लक्ष्मीला अर्पण करा. यानंतर हे नाणे पर्समध्ये ठेवा. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक फायदा होतो.

भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता मानले जाते. कुबेर यंत्र धनप्राप्तीसाठी शुभ मानले जाते. वास्तूनुसार कुबेर यंत्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्तीला धन-समृद्धी मिळते. कुबेर यंत्र पिवळ्या सूती कपड्यात गुंडाळून ठेवावे याची विशेष काळजी घ्या.

तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे असे वाटत असेल तर पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवा. असे मानले जाते की यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. तांदूळ हे वाढीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवल्याने धनात अपार वाढ होते.

माता लक्ष्मीला गोमती चक्र आवडते. वास्तुशास्त्रानुसार गोमती चक्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्ती कर्जापासून मुक्त होते आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारते.