Valentines Day 2023: 'या' राशीचा जोडीदार मिळाला तर प्रत्येक दिवसच प्रेमदिवस म्हणता येईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:37 IST
1 / 6प्रेम मागून मिळवण्याची गोष्ट नाही असे म्हणतात. पण काही सुखी जीव असे असतात ज्यांच्यावर न मागता प्रेमाचा वर्षाव होतो. विशेषतः प्रेम प्रकरणात त्यांचे नशीब त्यांच्याबाजूने असते. हा त्यांचा नाही तर त्यांच्या राशीचा गुण आहे. त्या पाच नशीबवान राशी कोणत्या हे जाणून घेऊया.2 / 6ज्योतिष शास्त्रानुसार, फ्लर्टिंगमध्ये मेष राशीचे पुरुष सर्वोत्तम असतात. या राशीची मुले मुलींना आकर्षित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार असतात. असे मानले जाते की या राशीची मुले प्रेमाबद्दल विशेष गंभीर नसतात, त्यांना प्रेमप्रकरणे मिरवण्यात धन्यता वाटते, म्हणून या राशीच्या मुलांच्या प्रेमात पडणाऱ्या मुलींनो जरा सावध राहा!3 / 6या राशीच्या मुलांचे व्यक्तिमत्त्व अतिशय मोहक असते, या गुणवत्तेच्या आधारे ते मुलींना आकर्षित करतात. या राशीची मुले त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. प्रेमात, या राशीच्या मुलांना खूप निष्ठावान मानले जाते.4 / 6या राशीची मुले सहजपणे लोकांना त्यांच्या बोलण्यात अडकवतात. सुंदर गोष्टी या लोकांना खूप आकर्षित करतात. अशा परिस्थितीत जर त्यांची एका सुंदर मुलीशी मैत्री झाली तर ते तिला आपल्या मोहजाळात सहज अडकवतात. ते कोणाबाबतीत पटकन गंभीर होत नाहीत. पण एकदा ते गंभीर झाले की मग ते संबंध आयुष्यभर प्राणपणाने जपतात.5 / 6असे म्हटले जाते की कन्या राशीच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत समजून घेणे थोडे कठीण आहे. या राशीच्या मुलांना ज्यांच्याबद्द जिव्हाळा वाटतो, त्यांच्याशीच ते नाते जुळवून घेतात. तुमचा जोडीदार कन्या राशीचा असेल तर तुम्ही भाग्यवान आहात, या राशीच्या लोकांवर प्रेमाच्या बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवला जाऊ शकतो.6 / 6तूळ राशीचे पुरुष लगेच कुणाकडेही आकर्षित होतात. व कुणालाही आपल्याकडे आकर्षित करून घेतात. हे लोक स्वभावाने खूप चंचल असतात. परंतु जोडीदाराबाबतीत खूप संवेदनशील असतात.