३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:07 IST
1 / 15Utpatti Ekadashi November 2025: संपूर्ण वर्षभरात २४ एकादशी साजऱ्या केल्या जातात. वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत.2 / 15Utpatti Ekadashi November 2025 Astrology Predictions: तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. चातुर्मास संपून कार्तिक महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. कार्तिक वद्य एकादशी शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी असून, याला उत्पत्ति एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीच्या तिथीला देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पन्ना एकादशी असेही म्हणतात.3 / 15उत्पत्ति एकादशीला अतिशय शुभ मानले गेलेले तीन राजयोग जुळून आलेले आहेत. यामध्ये हंस महापुरुष राजयोग, रुचक राजयोग अशा योगांचा समावेश आहे. या उत्पत्ति एकादशीचा कोणत्या राशींना लाभच लाभ प्राप्त होऊ शकेल, नेमके काय टाळावे, काय करू नये, कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया...4 / 15मेष: मनासारखे यश मिळेल. विविध आघाड्यांवर आगेकूच सुरू राहील. व्यवसाय, नोकरी, शैक्षणिक उन्नती या दृष्टीने अनुकूलता अनुभवायला मिळेल. उत्साह वाढू शकेल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. पगारवाढ व सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात आनंदी वातावरण राहील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. आरोग्याची काळजी घ्या.5 / 15वृषभ: चंद्राचे भ्रमण शुभ फळे देणारे ठरेल. पैसा, व्यावसायिक उत्कर्ष, मुलांचे यश, सामाजिक मान-सन्मान इत्यादी बाबतीत मनासारखे होईल. मात्र, थोडे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नाही तर घरचे आणि दारचे दुखावले जातील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडांशी सख्य राहील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे.6 / 15मिथुन: अडचणी दूर झाल्यामुळे हलके-हलके वाटेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. मनात आनंदी विचार राहतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे सोप्या पद्धतीने होतील. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या समवेत मजेत वेळ जाईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील, मोठ्या स्वरूपाचे लाभ होऊ शकतात. मात्र, व्यावसायिकांनी सावधपणे उलाढाली कराव्यात. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो.7 / 15कर्क: उच्च पद मिळू शकते. नोकरी, व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात भरभराट अनुभवायला मिळेल. मात्र, थोडी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. व्यावसायिक आडाखे चुकू शकतात. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. काहींना प्रवास घडून येईल.8 / 15सिंह: कामात व्यस्त राहाल. अनुकूल फळे देणारा काळ ठरण्याची शक्यता आहे. मधल्या काळात सावधपणे कामे करण्याची गरज आहे. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. शांत चित्ताने पण खंबीरपणे लोकांना उत्तरे द्यावी. मनात आध्यात्मिक विचार राहतील. महत्त्वाच्या कामात नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल, खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीत सहकारी वर्गाला नाराज करू नका.9 / 15कन्या: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. त्याचा फायदा घेऊन महत्त्वाची कामे झटपट आटोपून घ्या. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. पगारवाढ व इतर अनेक उत्तम लाभ होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. चंद्र भ्रमणामुळे संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल.10 / 15तूळ: अडचणी दूर होतील. नशिबाचा कौल मिळेल. समस्या दूर झाल्यामुळे हलके-हलके वाटेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोक कामाची प्रशंसा करतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कामातील बदल फायदेशीर ठरतील. घरात आनंदी वातावरण राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या.11 / 15वृश्चिक: भाग्याची चांगली साथ राहील. चांगले अनुभव येतील. घाईघाईत कामे करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यामुळे वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. आर्थिक बाजू बळकट राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. आत्मविश्वासाने कामे कराल. त्यामुळे यशस्वी व्हाल.12 / 15धनु: एखादा चांगला अनुभव येईल. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. लोकांच्या मोठ्या अपेक्षा असतील. कामाचा ताण मुत्सद्दीपणाने हाताळा.13 / 15मकर: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू प्राप्त होतील. विवाहेच्छूची स्वप्ने पूर्ण होतील. अति आत्मविश्वास बाळगू नका. लोकांच्या भानगडीत पडू नका. वाहने जपून चालवा. एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे मन आनंदून जाईल. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील.14 / 15कुंभ: काही कटू तर काही गोड अनुभव, असा एकंदरीत काळ आहे. उत्साह वाढवणारी एखादी घटना घडेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. काही अडचणी असतील. महत्त्वाची कामे रखडली जातील. योजना लोकांना सांगत बसू नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.15 / 15मीन: प्रकल्प यशस्वीपणे राबवाल. अनुकूल काळ राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. सामाजिक कार्य करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. लोक कामाची प्रशंसा करतील. मुले प्रगती करतील. जवळचे प्रवास कार्यसाधक ठरतील. हाती घेतलेले प्रकल्प पूर्वार्धात सफल ठरतील. आरोग्याची काळजी घ्यावी. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.