३ ग्रह, ३ राजयोग: ‘या’ ४ राशींवर लक्ष्मी कृपा; अपार लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल, वरदान काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:55 IST
1 / 9ज्योतिषशास्त्रात सूर्याला नवग्रहांचा राजा मानले गेले आहे. १६ डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध आणि शुक्र आधीपासूनच विराजमान आहेत. सूर्याच्या धनु प्रवेशानंतर या राशीत अतिशय शुभ योग जुळून येत आहेत. (trigrahi yoga in dhanu rashi december 2022)2 / 9शुक्र आणि बुधाच्या युतीने धनु राशीत लक्ष्मीनारायण योग तयार झाला आहे. आता सूर्य बुधासोबत बुधादित्य योग तयार करेल. धनु राशीतील त्रिग्रही योग, लक्ष्मीनारायण योग आणि बुधादित्य योगामुळे चार राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. (surya budh shukra trigrahi yoga in sagittarius 2022)3 / 9सूर्य, बुध आणि शुक्र या तीन ग्रहांच्या युतीने जुळून येत असलेल्या विविध शुभ योगांचा सकारात्मक प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळू शकतो. धन आणि मिळतीची संबंधित प्रकरणे सकारात्मक होतील. पदोन्नती आणि उत्पन्नातही वाढ होऊ शकते. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना हे ग्रह योग लाभदायक ठरू शकतात, ते जाणून घेऊया...4 / 9वृषभ राशीच्या व्यक्तींना धनु राशीमध्ये तयार होत असलेला त्रिग्रही योग सकारात्मक परिणाम देईल. तुम्हाला अनेक उत्कृष्ट परिणाम मिळतील. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. तुमच्या भाषणाने तुम्ही लोकांची मने जिंकू शकाल. आर्थिकदृष्ट्या पैशाचा ओघ चांगला राहील. खर्चावर नियंत्रण राहील आणि पैशाची बचत होईल.5 / 9तुळ राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग शुभ राहणार आहे. विशेषत: जे मार्केटिंग, सोशल मीडिया किंवा कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करत आहेत, जिथे संवाद कौशल्ये खूप महत्त्वाची आहेत, त्यांना या काळात चांगल्या नफ्याच्या रूपात सकारात्मक परिणाम मिळतील. पैसा आणि करिअरच्या आघाडीवर तुम्हाला खूप शुभ परिणाम मिळतील.6 / 9धनु राशीत सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने धनु त्रिग्रही योग तयार होत आहे. तुम्हाला मिळणारा आदर वाढू शकेल. तसेच दर्जा वाढणे शक्य आहे. नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता समोरच्या व्यक्तीला प्रभावित करेल. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. पदोन्नतीचीही शक्यता आहे.7 / 9मीन राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योगाचा सकारात्मक परिणाम मिळू शकतो. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर लवकरच शुभवार्ता मिळू शकते. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला काही चांगल्या संधी किंवा ऑफर्स मिळू शकतात. मात्र, काही प्रकरणांमध्ये आपल्याला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. या काळात कोणाशीही कर्जाचे व्यवहार करू नका. कुटुंबातील सदस्य किंवा बाहेरील व्यक्तींशी वादात पडू नका.8 / 9सन २०२२ च्या अखेरीपर्यंत त्रिग्रही योगचा प्रभाव दिसून येऊ शकेल. यानंतर बुध आणि शुक्र ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतील. विशेष म्हणजे या डिसेंबर महिन्यात बुध दोनवेळा राशीबदल करणार असून, वक्रीही होणार आहे. 9 / 9यामुळे डिसेंबरचा महिना अनेकार्थाने शुभ आणि महत्त्वाचा मानला गेला आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.