'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे' हा फंडा वापरून निर्णय घेण्यात यशस्वी होणाऱ्या 'या' तीन राशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 02:59 PM2021-10-16T14:59:31+5:302021-10-16T15:03:37+5:30

निर्णय घेता येणे ही एक कला आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर विशेष बाब ही, की निर्णय घेताना आपली द्विधा मनस्थिती होते. करू की नको, पुढे जाऊ की नको, होकार द्यावा की नकार अशा प्रश्नांनी आपण घेरलेले असतो. दुसऱ्यांचे सल्ले घेतो मनाचा गुंता आणखी वाढवतो. काही राशीच्या लोकांवर इतरांच्या सुख-दु:खाचा प्रभाव पडतो, पण ते लवकर सावरतात आणि सक्षम बनतात. असे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात आणि तटस्थपणे निर्णय घेतात.

ज्योतिशास्त्र सांगते, बारा राशींपैकी तीन राशी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अग्रेसर असतात. निर्णय घेणे म्हणजे तरी नेमके काय, तर पुढे जे होईल त्याची जबाबदारी घेण्यास सिद्ध असणे. पुढील तीन राशींमध्ये हा आत्मविश्वास ठळकपणे दिसून येतो. त्या राशी कोणत्या हे जाणून घेऊ.

कन्या राशीचे लोक अतिशय नम्र, मृदू अंतःकरणाचे आणि भावनिक असतात. मात्र निर्णय घेताना ते स्वार्थी होतात. आपला फायदा तोटा पाहून मगच ते निर्णय घेतात. ते आपली प्रतिमा उजळ ठेवण्यासाठी इतरांसमोर चांगले बनतात. इतरांचे कितीही नुकसान झाले तरी हरकत नाही ते स्वतःची बाजू जपतात.

मकर राशीचे लोक निर्णय घेताना सगळ्यांच्या सूचना ऐकून घेतील पण निर्णय घेण्याची वेळ आली की स्वतःच्या विवेक बुद्धीला जे पटेल तोच निर्णय घेतील. शनी देवाच्या कृपेने या लोकांमध्ये भावना आणि तटस्थपणा दोन्ही समप्रमाणात असतो. ते चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत नाहीत. जे योग्य आहे तीच बाजू लावून धरतात. यात स्वतःचे नुकसान झाले तरी ते न्यायाच्या बाजून कौल देतात.

कुंभ राशीच्या लोकांचे निर्णय सतत बदलत असतात. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे निर्णय बदलत राहतात. त्यामुळे त्यांची गैरसोय कधीच होत नाही. नको तिथे भावनिक न होता ते परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतात. ते बुद्धिमान असतात आणि त्यांनी जे काही करायचे ठरवले ते करतात. ते त्यांची बुद्धिमत्ता केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्या भल्यासाठी वापरतात.