विशेषतः 'या' चार राशीच्या लोकांनी मोत्याची अंगठी किंवा लॉकेट घातल्यास होतात अनेक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:41 AM2021-09-17T11:41:16+5:302021-09-17T18:40:24+5:30

बरेच लोक मोत्याचे लॉकेट गळ्यात किंवा चांदीत घडवलेली मोत्याची अंगठी घालतात. ज्योतिषशास्त्रानुसार मोती चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहेत. हे शरीरातील पाण्याचे घटक आणि कफ नियंत्रित करते. चला जाणून घेऊया, मोत्याची अंगठी वापरण्याचे फायदे आणि कोणत्या राशींना ती विशेष अनुकूल ठरते ते!

असे म्हटले जाते की गोल आकाराचे मोती हा मोत्यांमधला सर्वोत्तम प्रकार आहे. जर गोल आकाराचे पिवळ्या रंगाचे मोती असतील तर असे मोती धारण करणारा बुद्धीने तेजस्वी होतो.

चांगला नवरा मिळावा म्हणूनही अनेक मुली ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार लांब आकाराच्या मोत्याची अंगठी घालतात.

नैसर्गिकरित्या आकाशी रंगाचा असलेला मोती परिधान करणाऱ्याची संपत्ती वाढते.

मोत्यांचा वापर मन संतुलित ठेवतो. चंद्राची शीतलता मोत्यात असते आणि ती परिधान करणाऱ्यांत उतरते. तसेच मनात सकारात्मक विचार निर्माण होतात.

विशेषतः मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी मोती परिधान करणे फायदेशीर आहे.

सिंह, तुला आणि धनु राशीच्या व्यक्तींना केवळ विशेष परिस्थितीत मोती घालण्याचा सल्ला दिला जातो. उर्वरित राशीच्या जातकांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय मोती घालू नये.

शुक्ल पक्षाच्या सोमवारी रात्री करंगळीमध्ये चांदीत घडवलेली मोत्याची अंगठी परिधान करावी. काही लोक पौर्णिमेला देखील मोत्याची अंगठी घालण्याचा सल्ला देतात. मोत्याची अंगठी वापरण्याआधी ती महादेवासमोर पुजून मगच तिचा वापर करावा. अधिक लाभ होतात.