Surya Grahan 2023: शनी अमावस्येला सूर्याला ग्रहण लागणार असले तरी 'सहा' राशींना होणार घसघशीत लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 11:55 AM2023-10-13T11:55:53+5:302023-10-13T12:00:12+5:30

Surya Grahan 2023: १४ ऑक्टोबर रोजी या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण आहे आणि त्याच दिवशी सर्वपित्री तसेच शनी अमावस्या आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे भाविकांच्या मनावर थोडे दडपण निश्चित आले असणार. त्यावर उतारा म्हणून ज्योतिष शास्त्राने १२ पैकी सहा राशींना दिलासा दिला आहे, की या दिवसाचा त्यांच्या राशीवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

सूर्यग्रहण अशुभ मानले जात असले, तरी या खगोलशास्त्रीय घटनेमुळे अवकाशातील ग्रहस्थितीत अनेक बदल घडले. ज्याआधारावर ज्योतिष शास्त्राने सहा राशींचे भाग्य बदलत असल्याचे म्हटले आहे. त्या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊ.

हे ग्रहण वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत देत आहे. या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि गुंतवणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती आणि सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल.

ज्योतिषांच्या मते हे ग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील फायदेशीर आहे. वाद मिटतील, कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांकडूनही चांगली बातमी मिळेल.

सिंह राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण शुभ ठरणार आहे. ग्रहणाच्या प्रभावाने जमीन आणि मालमत्तेवरील वाद मिटण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरीत धनलाभ आणि पदोन्नतीचे पूर्ण योगायोग आहेत.

कन्या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि कामात यश मिळेल. कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. नवीन काम सुरू करून त्यात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

मकर राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण लाभदायक आहे. नोकरी आणि व्यावसायिक दोघांना बढती आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठीही हे ग्रहण शुभ आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमीन किंवा घर खरेदीच्या बाबतीत फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंद आणि समृद्धी वाढेल.