सूर्याचा मेष प्रवेश: ‘या’ ७ राशींना अत्यंत शुभ फलदायी, ५ राशींसाठी संमिश्र; तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 07:07 AM2023-04-15T07:07:07+5:302023-04-15T07:07:07+5:30

सूर्याच्या मेष प्रवेशाने अनेक शुभ योग जुळून येत आहेत. तुमच्यासाठी आगामी काळ कसा ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य नवग्रहांचा राजा मानला गेला आहे. हाच नवग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत विराजमान झाला आहे. मेष ही सूर्याची उच्च रास आहे. म्हणजेच या राशीत सूर्य उच्च, सर्वोत्तम फले देऊ शकतो. कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत असेल तर सूर्याची शुभ फले मिळू शकतात, असे म्हटले जाते.

सूर्याच्या मेष राशीतील संक्रमणाला मेष संक्रांत असे म्हटले जाते. सूर्याच्या मेष प्रवेशाने अनेक शुभ योग जुळून येत आहेत. आताच्या घडीला मेष राशीत बुध आणि राहु विराजमान आहेत. सूर्याच्या मेष प्रवेशानंतर बुधासोबत बुधादित्य राजयोग आणि बुध तसेच राहुसोबत त्रिग्रही योग जुळून येत आहे.

एकूणच सूर्याचे मेष संक्रमण महत्त्वाचे मानले जाते. सूर्याच्या मेष प्रवेशाचा काही राशींना लाभ होऊ शकेल, तर काही राशींसाठी आगामी काळ संमिश्र ठरू शकेल. तुमच्यासाठी कसा असेल प्रभाव? कोणत्या राशींना कसा लाभ मिळू शकतो? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...

मेष राशीत होत असलेले सूर्याचे आगमन या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी ठरू शकेल. आर्थिक बाजूबद्दल बोलायचे तर हा काळ फायदेशीर ठरू शकेल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. प्रगती होऊ शकेल. नफा कमवू शकाल. अनेकार्थाने सूर्याचे आगमन या राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरू शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. कामात काही कारणाने अडथळे येऊ शकतात. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत नातेसंबंधात चढ-उतार होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्याशी मतभेद होऊ शकतात. खर्चात वाढ होऊ शकते.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. कमी वेळेत जास्त नफा मिळवू शकाल. परदेशातूनही पैसे कमविण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करताना प्रशंसा मिळू शकेल. नशिबाची साथ मिळू शकेल. कौटुंबिक वातावरणही चांगले राहू शकेल. नवीन कामेही पूर्ण होऊ शकतील.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश अनुकूल ठरू शकतो. करिअरमध्ये चांगले लाभ होऊ शकतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यताही निर्माण होत आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकते. आर्थिक फायदा होऊ शकतो. मनातील प्रत्येक गोष्ट जोडीदारासोबत शेअर करु शकाल. नाते मजबूत होईल. व्यवसाय करणार्‍या लोकांसाठी चांगले परिणाम आणणार आहे. व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश लाभदायक ठरू शकेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. नेहमीपेक्षा जास्त नफा मिळवण्यास सक्षम असाल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. कौटुंबिक संबंधांच्या बाबतीतही हा काळ चांगले परिणाम देऊ शकेल. मुलांसोबतही चांगला वेळ घालवू शकाल. जीवनात सकारात्मक बदल होतील.

कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही कामे सहज पूर्ण होतील, तर काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. नात्यात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. खर्च वाढू शकतात. नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे अडचणी येऊ शकतात.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. बोलण्यावर व वागण्यावर संयम ठेवावा लागेल. व्यवसाय करत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. नफा मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश यशकारक ठरू शकेल. कामात प्रगती होऊ शकेल. यश मिळू शकेल. उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकेल. नफाही मिळू शकेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहू शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सर्व चिंता दूर होऊ शकतील. सकारात्मक उर्जेने परिपूर्ण राहू शकाल. आरोग्य चांगले राहू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश चांगल्या संधींचा ठरू शकेल. नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतील. आर्थिक लाभाचा शुभ संयोग घडू शकेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहू शकेल. सर्व कामे पूर्ण करणे शक्य होऊ शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना फायदा होऊ शकेल. सकारात्मकतेने पुढे जाणे हिताचे ठरू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. व्यावसायिक व्यवहारात सावध रहावे. नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण राहू शकेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.

कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. करिअरमध्ये यश मिळू शकेल. आरोग्यात सकारात्मक बदल होऊ शकतील. आरोग्याशी संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवेल असे नाही. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. बचत करण्यात यश मिळू शकेल. चांगले पैसे कमवू शकाल. व्यावसायिकांची चांगली प्रगती होऊ शकेल. व्यवसाय विस्ताराचे नियोजनही करू शकाल.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. मित्रांमुळे काही त्रास होऊ शकतो. गुप्त गोष्टी सांगू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. सुसंवादाचा अभाव असू शकतो. कामासोबतच आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.