पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:30 IST
1 / 13शुक्रवार, २५ जुलै रोजी चंद्रापासून अकराव्या घरात शुक्र राशीच्या संक्रमणामुळे वसुमान योग तयार होत आहे. या शुभ योगात, धनाची देवी लक्ष्मी कृपावर्षाव करेल. ज्यामुळे केलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल, व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होतील. प्रत्येक कामात यश मिळेल आणि श्रावणाची सुरुवात आनंदादयी होईल! 2 / 13मेष : नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमधील काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. तुमचे काम पाहून कामाच्या ठिकाणी पदोन्नतीबद्दल चर्चा होऊ शकते. तसेच, तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे मन कामावर केंद्रित राहील. मुलांची काळजी दूर होईल आणि उत्साहाचे वातावरण राहील. 3 / 13वृषभ : तुम्ही प्रत्येक काम पूर्ण उत्साहाने पूर्ण कराल आणि त्यात यश देखील मिळवाल. यामुळे तुमचे मन आनंदी राहील. बराच काळ कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची सोय होईल. गुंतवणूक तसेच व्यवसायाच्या बाबतीत जपून व्यवहार करा. हा श्रावण तुमच्यासाठी काही आनंदाच्या क्षणांमुळे अविस्मरणीय ठरेल. 4 / 13मिथुन : येणाऱ्या काळात तुम्ही कामामध्ये गढून जाल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात, ज्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. त्याचा रग्गड मोबदलाही मिळेल. कुटुंबात शुभ कार्य घडेल. नवीन वस्तूंची खरेदी शुभदायी ठरेल. 5 / 13कर्क : तुम्हाला कोणत्याही बौद्धिक कामात यश मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या, तरच लाभ होईल. ध्यान आणि अध्यात्मात तुमची आवड वाढू शकते. तसेच, तुम्ही धार्मिक सहलीला जाण्याची योजना आखू शकता.6 / 13सिंह : नोकरदारांसाठी हा आनंदाचा दिवस ठरेल. कामाचे कौतुकही होईल. सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. पदोन्नती तसेच पगार वाढीची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. कायद्याशी संबंधित गोष्टींमध्ये दिलासा मिळेल. आर्थिक बाजू सक्षम होईल. 7 / 13कन्या: सर्जनशील कामात तुमची आवड वाढू शकते. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाजू शक्ष्म करण्याची संधी मिळेल. संधीचे सोने करा. कर्जबाजारी असाल तर कर्जमुक्तीचे मार्ग सापडतील. प्रयत्नात कुचराई करू नका. चुकूनही वाईट मार्ग निवडू नका. 8 / 13तूळ : व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. मात्र मित्र कोण, शत्रू कोण हे ओळखून वेळीच सावध व्हा. उधारी घेऊ नका आणि देऊही नका. आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी गुंतवणुकीवर भर द्या. घरात कुटुंबसौख्य लाभेल. 9 / 13वृश्चिक : व्यवसायाच्या बाबतीत, तुम्हाला आता तुमच्या योजना अंमलात आणण्याची संधी मिळू शकते. पैशाच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांकडेही थोडे लक्ष द्यावे लागेल. शांत डोक्याने काम करा, यश मिळेल. 10 / 13धनु : कामात व्यग्र झाल्यामुळे थकवा जाणवेल, पण कामं नीट पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. तुमच्या कामाची, मेहनतीची दखल घेतली जाईल. आत्मविश्वास वाढवावा लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. यश मिळेल. 11 / 13मकर : कोणत्याही कायदेशीर कागदपत्रावर स्वाक्षरी करताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. अन्यथा फसवणूक होऊ शकते. कामाचा बोजा जाणवेल पण वेळेत पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुकही होईल. घरात आनंददायी वातावरण राहील. 12 / 13कुंभ : ज्या गोड बातमीची वाट बघत होता, ती मिळण्याची शक्यता आहे. सहलीचे आयोजन, नवीन लोकांशी भेटी गाठी आनंददायी ठरतील. आर्थिक लाभाचीही चांगली शक्यता आहे. विवाहेच्छुकांना मनासारखे स्थळ चालून येईल. 13 / 13मीन : तुमच्या कलागुणांना वाव मिळू शकतो. एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर तीही दूर होईल. आर्थिक बाजू सक्षम होण्यासाठी नवनवीन संधी मिळतील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील, परंतु कौटुंबिक आनंदामुळे क्षुल्लक गोष्टींचा विसर पडेल.