मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 08:08 IST
1 / 15Shravan Sankashti Chaturthi Angarak Yog 2025: श्रावणातील संकष्ट चतुर्थी मंगळवारी आहे. विशेष म्हणजे श्रावण संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. चतुर्थीला अंगारक योग वारंवार जुळून येत नाही. अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय शुभ पुण्य फलदायी मानली गेली आहे. या दिवशी केलेले गणेश पूजन लाभदायी, इच्छापूर्ती करणारे मानले गेले आहे.2 / 15अवघ्या काही दिवसांनी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीचे व्रत महत्त्वाचे मानले जाते. या श्रावण अंगारकी संकष्टी चतुर्थीला गजलक्ष्मी, बुधादित्य असे काही राजयोग जुळून येत आहेत. या राजयोगांमुळे श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अधिकच वाढल्याचे म्हटले जात आहे.3 / 15गणपतीची शाश्वत कृपा लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. या दिवशी आवर्जून गणपतीचे विशेष पूजन करावे. अथर्वशीर्षासह गणपतीची विविध स्तोत्रे म्हणावीत. मंत्रांचे जप करावेत, असे म्हटले जाते. श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीचा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? तुमची रास कोणती? गणपती बाप्पाचे शुभाशिर्वाद, सर्वोत्तम लाभ, भरघोस नफा फायदा कोणत्या राशींना होऊ शकेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: यशासाठी कसून प्रयत्न करावे लागतील. वाटेत अडथळे आले तरी धीर सुटू देऊ नका. हळूहळू सर्व काही आपल्या ताब्यात येईल. मंगळवार आणि बुधवार हे धाडसी प्रयोग टाळण्याचे दिवस आहेत. नियम व कायद्याचे बंधन पाळा. शनि, नेपच्यून व चंद्राची व्ययस्थानातील युती अनावश्यक खर्च व वाद ओढवू शकते. गुरुवारपासून अडचणी दूर होऊ शकतील. ठरविलेले प्रत्येक काम यशस्वीरीत्या पूर्ण होईल. मध्यावधीपासून अनुकूलता राहील.5 / 15वृषभ: जबाबदाऱ्या वाढतील. कामात गढून जाल. घरगुती जबाबदाऱ्यांसाठीही वेळ काढावा लागेल. पाहुण्यांची वर्दळ असेल. महत्त्वाचे निर्णय घेताना आणि मोठ्या देवाणघेवाणीत सतर्कता बाळगा. अंधविश्वास टाळा. खर्चाचा वेग वाढेल, प्रवासात काळजी घ्यावी. कालांतराने ताण हलका होईल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. सावधगिरी हाच मंत्र ध्यानात ठेवा.6 / 15मिथुन: प्रवासाची आखणी होईल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. मात्र, दशम स्थानातून शनि-नेपच्यून-चंद्र भ्रमणामुळे कार्यक्षेत्रात संशयाचे सावट राहील. कामात अनपेक्षित बदल होऊ शकतात. संयम गरजेचा आहे. सुदैवाने मित्रमंडळींचा हातभार मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, तरी पैसा खर्च करण्याची ओढ वाढेल. आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. मन अध्यात्माकडे झुकलेले जाणवेल. प्रवासात सतर्क राहा.7 / 15कर्क: धीर धरून पुढे चला. एखाद्या कामात पूर्णपणे गुंतून राहाल. धावपळ आणि दगदग होईल. सार्वजनिक क्षेत्रात अति सावध राहा. झेपतील तेवढीच कामे हातात घ्यावी. काही जण बदनामी करण्याचा प्रयत्न करतील, तरी धीर सोडू नका. गुरुवारपासून परिस्थिती सुधारेल. नवी संधी मिळतील. नोकरीत तुमचे महत्त्व अधोरेखित होईल. शनिवारी अचानक फार मोठा फायदा होऊ शकतो. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील.8 / 15सिंह: व्यवसायात सतत व्यग्र राहाल. काही कठीण आव्हाने पेलावी लागतील. शनि-नेपच्यून-चंद्र युतीमुळे मंगळवार, बुधवार धाडसी साहस टाळणे हिताचे ठरेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा, नियमांचे पालन करा. नेहमीची कामे वेळेत पूर्ण करा. नंतर भाग्याची साथ मिळेल. अडथळे दूर होऊन कामात सुगमता येईल. नशिबाचा कौल बाजूने राहील. चांगले अनुभव येतील.9 / 15कन्या: ग्रहमान संमिश्र राहील. चंद्राचे भ्रमण पाहता, प्रत्येक गोष्टीत सावधपणे वागा. कुणालाही आश्वासने देऊ नका, अंधविश्वास ठेवू नका. वाहन काळजीपूर्वक चालवा, नियमांचे उल्लंघन टाळा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात अंदाज कधी चुकू शकतात, म्हणून वडिलधाऱ्यांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. चांगली बातमी कळेल.10 / 15तूळ: आर्थिक भरभराट होईल. हातात पैसा येऊन आर्थिक बाजू मजबूत होईल. बचतीची ओढ वाढेल. विविध प्रकारचे लाभ मिळतील. भावंडांशी स्नेहपूर्ण संबंध राहतील. मुलांशी संवाद ठेवा, त्यांचे विचार समजून घ्यावा. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; आहार-पथ्य पाळा. व्यवसायात प्रगती होईल. काहींना अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहा. शनिवारी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.11 / 15वृश्चिक: वेळेचा सुयोग्य वापर, सदुपयोग करा. आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवाल. कामाचा ताण जाणवेल; पण वेळेचे योग्य नियोजन केल्यास सर्व काही सांभाळता येईल. घरात पाहुण्यांची वर्दळ असेल. किरकोळ कारणांवरून वाद होऊ नयेत, याची काळजी घ्यावी. आर्थिक प्राप्ती चांगली राहील आणि थोडी चंगळही होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष कमी करू नये. मुलांच्या सहवासात प्रेम आणि लक्ष दोन्ही ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्यावे. मोहाच्या जाळ्यात अडकू नका.12 / 15धनु: गैरसमज टाळा. ग्रहमान संमिश्र असल्याने सतत व्यस्तता राहील. भावंडांशी वाद होऊ नयेत, याची काळजी घ्यावी. जवळच्या प्रवासाची शक्यता आहे. मात्र, प्रवासात सावधगिरी बाळगा. घरातील किरकोळ वाद वाढू देऊ नका. मुलांच्या यशस्वी कामगिरीची बातमी आनंद देईल. तब्येतीकडे लक्ष द्यावे. आपल्या योजना जाहीरपणे मांडण्याऐवजी शांतपणे काम करा. जीवनसाथीचा आधार मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. बोलून न दाखवता करून दाखवा.13 / 15मकर: तटस्थपणे विचार करा. आर्थिक आवक समाधानकारक असेल; पण देवाण-घेवाणीचे व्यवहार विचारपूर्वक करा. चुकीच्या गुंतवणुकीचा सल्ला कुणी देऊ शकते. चौकशी करूनच निर्णय घ्यावा. चांगल्या मित्रांच्या सहवासात राहा. व्यवसायात अंदाज काही वेळा चुकू शकतात. जवळच्या प्रवासाची संधी येईल; पण अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा. तुमची खास माहिती उघड करू नका. भावंडांशी सलोखा ठेवा. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या येतील. मुलांना यश मिळेल.14 / 15कुंभ: गुरू-शुक्राचा गजलक्ष्मी योग लाभदायक ठरेल. आर्थिक व सामाजिक दोन्ही लाभ मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहून उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, उसने पैसे देताना नीट विचार करा. धनस्थानातील शनि-नेपच्यून-चंद्र युतीमुळे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वडिलोपार्जित संपत्ती विषयक कामे करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा; कराराच्या अटी नीट वाचा. आरोग्याच्या दृष्टीने आहार-पथ्य पाळा. व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील.15 / 15मीन: व्ययस्थानातील राहु-चंद्र युतीमुळे काही अडचणी संभवतात. कायद्याचे पालन करा आणि अनावश्यक खर्च टाळा, शनि-नेपच्यून-चंद्र युतीमुळे मंगळवार, बुधवार मनावर काळजीचे ढग दाटतील. कुणी तुम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करू शकते. गुरुवार आणि शुक्रवारपासून आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. शनिवारीही परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.