Sankashti Chaturthi 2022 : बाप्पाच्या कृपेने बाराही राशींसाठी शुभ ठरणार हा आठवडा; मिळेल शुभवार्ता आणि बरेच काही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:55 PM2022-04-18T13:55:46+5:302022-04-18T14:06:36+5:30

Angarak Sankashta Chaturthi 2022 : प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो असे म्हणतात. त्यात प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली तर दुधात साखरच. त्यादृष्टीने ज्योतिष शास्त्र दर दिवशी, दर आठवड्याला राशी भविष्य सांगून आशेचा किरण देत असते. त्यातच १९ एप्रिल रोजी अंगारक चतुर्थी आहे.

बाप्पाच्या आशीर्वादाने समाविष्ट असलेला हा आठवडा १८ -२४ या कालावधीत तुमच्या राशीसाठी कोणत्या खास गोष्टी घेऊन येणार आहे, ते जाणून घ्या आणि त्यादृष्टीने संधीचे सोने करा किंवा आगामी काळासाठी संधी निर्माण करा.

या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सरकारी कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील.या आठवड्यात नशिबाची चांगली साथ लाभणार आहे.

या आठवड्यात कामाशी संबंधित नवीन योजना करण्यात यशस्वी व्हाल. मोठे व्यापारी किंवा अधिकारी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. जुनी नाती उपयुक्त ठरतील, लाभ देतील. मित्रांच्या मदतीने तुम्ही शत्रूंचा पराभव करू शकाल.

या आठवड्यात तुम्ही अशुभ परिस्थितींवर विजय मिळवणार आहात. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात तुम्हाला रिअल इस्टेटमधून चांगले फायदे मिळतील.

या आठवडय़ात उद्योग-व्यवसायात वाढ होईल. उच्च पदावर असलेल्या लोकांशी संबंध निर्माण होतील आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवला जाईल. नवीन लोकांशी संवाद वाढेल आणि त्यांच्याशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित होईल. या आठवड्यात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून सर्व शक्य सहकार्य आणि मदत मिळेल.

धार्मिक कार्यासाठी हा आठवडा चांगला आहे. प्रवासाचीही संधी मिळेल. कुटुंबात मंगल कार्य होईल. तुमच्या हुशारीने तुम्हाला कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता दिसून येईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकाल.

या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून खूप स्नेह मिळेल. धर्मावरील श्रद्धा वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी राहील. संभाषण कौशल्य आणि चपळता वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळतील. कोर्ट-कचेरीत विजय मिळेल.

हा आठवडा संमिश्र आणि फलदायी राहील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या स्वभावात आणि वागण्यात परिपक्वता दिसून येईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. आरोग्याची काळजी घ्या.

या आठवड्यात सरकारी क्षेत्रात मान-सन्मान आणि लाभ मिळेल. उच्चपदस्थ लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. राजकारणात तुमचे आकर्षण असेल, परंतु राजकारणात गुंतलेल्या लोकांपासून तुम्ही थोडे सावध राहावे, अन्यथा तुमच्यासाठी संकट निर्माण होईल.

या आठवड्यात व्यवसायात यश मिळणार नाही, मात्र कुटुंबात आनंद राहील, आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे. या आठवड्यात उच्चपदस्थ लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील. कुटुंबाबाबत चांगली बातमी मिळाल्याने आनंदाचे वातावरण राहील.

या आठवडय़ात तुमची कामे आणि धर्माशी संबंधित कामांवर पैसा खर्च होईल. तुम्हाला तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुमचा कल धार्मिक कार्यांकडे असेल. कुटुंबाकडून आनंद आणि सहकार्य चांगले राहील.

या आठवडय़ात कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अन्यथा मानसिक तणाव वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. प्रतिष्ठा वाढू शकते. धार्मिक कार्य आणि उदात्त कार्यात पूर्ण निष्ठेने सहकार्य कराल. तुमच्या क्षेत्रातील लोकांमध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल.

या आठवड्यात तुम्हाला राजकारणात यश मिळवण्याच्या संधी मिळू शकतात आणि सरकारी सेवेतील उच्चपदस्थ लोकांशी तुमची मैत्री होईल. परोपकारी स्वभावाचे असल्याने तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काम कराल. तुम्हाला सरकारकडून किंवा सरकारी योजनेतून पैसे मिळतील.