मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पाच नैसर्गिक उपाय सांगताहेत सद्गुरु!
Published: February 25, 2021 02:38 PM | Updated: February 25, 2021 03:46 PM
आजच्या काळात जो उठतो, तो नैराश्य, कंटाळा, आळस, अस्वस्थता असे शब्द वरचेवर वापरताना दिसतो. अगदी शाळकरी मुलांपासून वयोवृद्धांच्या तोंडी ही भाषा आहे. यातून बाहेर पडायचा प्रामाणिक प्रयत्न करणारे, प्रश्नाचे मूळ शोधणारे फार कमी लोक असतात. अधिकतर लोक मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू करतात. परंतु, मूलत: जे बदल केले पाहिजे, ते करतच नाहीत. म्हणून सद्गुरू मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पाच नैसर्गिक उपाय सुचवतात.