शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रक्षाबंधन: घट्ट नात्यासाठी भाऊरायाला राशीनुसार बांधा राखी; कोणता रंग ठरेल सर्वांत लकी? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:08 AM

1 / 12
Raksha Bandhan 2023: ३० ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ३० ऑगस्ट रोजी दिवसभर रक्षाबंधन करता येणार आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते.
2 / 12
मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे.
3 / 12
बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते. तसेच बाह्य शत्रू आणि अंतर्विकारांवर आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो, ही भावनाही त्यात असते. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो, असे सांगितले जाते.
4 / 12
ज्योतिषशास्त्राप्रमाणे राशीनुसार भावाला विशिष्ट रंगाची राखी बांधल्यास नाते दृढ होण्यास मदत होते, असे सांगितले जाते. तुमच्या भाऊरायाची रास कोणती, त्याप्रमाणे त्या रंगाची राखी बांधल्यास भावाला त्याचे उत्तम लाभ मिळू शकतील, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या रक्षाबंधनाला कोणत्या रंगाची राखी आपल्या भावासाठी लकी ठरेल? जाणून घेऊया...
5 / 12
मेष व वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. तुमच्या भावाची रास मेष किंवा वृश्चिक असेल, तर त्याला लाल रंगाची राखी बांधावी. लाल रंगाची राखी भाऊरायाच्या जीवनात नवीन ऊर्जेचा संचार करण्यास मदत करेल, असे सांगितले जाते.
6 / 12
वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तुमच्या भावाची रास वृषभ किंवा तुळ असेल, तर त्याला राखाडी/सिल्वर रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भाऊरायाच्या जीवनात शुभ परिणाम आणण्यासाठी ती उपयुक्त ठरेल, असे सांगितले जाते.
7 / 12
मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे. तुमच्या भावाची रास मिथुन किंवा कन्या असेल, तर त्याला हिरव्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यास ती लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जाते.
8 / 12
धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरू आहे. तुमच्या भावाची रास धनु किंवा मीन असेल, तर त्याला केशरी व पिवळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख आणि शांतता आणण्यास ती उपयुक्त ठरेल, असे सांगितले जाते.
9 / 12
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. तुमच्या भावाची रास मकर किंवा कुंभ असेल, तर त्याला गडद निळा वा निळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. यामुळे भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक दृढ होईल, असे सांगितले जाते.
10 / 12
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. तुमच्या भावाची रास कर्क असेल, तर त्याला पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची राखी बांधवी. यामुळे भाऊरायाच्या जीवनात आनंदाचा गुणाकार होत राहील, असे सांगितले जाते.
11 / 12
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तुमच्या भावाची रास सिंह असेल, तर त्याला केशरी किंवा सोनेरी रंगाची राखी बांधावी. यामुळे भाऊरायाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी ती उपयुक्त ठरेल. तसेच भावा-बहिणीमधील प्रेम वाढेल, नाते दृढ होईल, असे सांगितले जाते.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य