By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:32 IST
1 / 12येत्या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्त होईल. त्यासाठी कुटुंबियांचे व मित्रपरिवाराचे सहकार्य मिळेल. 2 / 12या राशीच्या लोकांना कामातून फुरसत मिळणार नाही, तसेच नवनव्या संधी चालून येतील. कुटुंबियांचे प्रेम आणि सहवास मिळेल. 3 / 12बऱ्याच काळापासून अडलेली अनेक कामे मार्गी लागतील. दरम्यान प्रवास योग असल्याने तीर्थयात्रा केल्यास त्या यशस्वी होतील. 4 / 12कामात व्यस्त रहाल. मनासारख्या संधी चालून येतील. नवीन क्षेत्रात स्वतःला आजमावून पहाल. 5 / 12हितशत्रूंवर मात कराल. मुलांची प्रगती होईल. त्यांच्याकडून आनंदवार्ता कळतील. कोणाशीही वादविवाद टाळा 6 / 12कन्या राशीसाठी रक्षाबंधन अधिक लाभदायी ठरणार आहे. येत्या काळात त्यांना मानसन्मानाच्या संधी प्राप्त होतील आणि विरोधक नमते घेतील. 7 / 12मुलांकडून आनंद वार्ता समजतील. उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या संधी येतील. आगामी काळात कार्यमग्न राहाल. 8 / 12येत्या काळात कामाचा ताण असेल, परंतु कोणत्याही प्रकारे घाई गडबड करू नका, नुकसान होईल. मन लावून, जिद्दीने काम केलेत, तर आगामी काळ तुमचाच आहे असे समजा!9 / 12तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. त्या कामासंदर्भात असतील नाहीतर प्रापंचिक असू शकतील. त्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तुम्ही तयारीत राहा. त्यातून निश्चितच चांगले घडणार आहे. 10 / 12अनेक दिवसांपासून भेडसावत असलेली आर्थिक समस्या दूर होईल. उत्पन्न वाढेल आणि लवकरच मोठ्या कार्यात, क्षेत्रात यशस्वी व्हाल!11 / 12बृहस्पतीच्या कृपेने तुमच्या अडलेल्या कामाला गती मिळेल आणि उत्पन्नात वाढ होईल. सरकारी कामात यश मिळेल. 12 / 12मीन राशीच्या आर्थिक अडचणी दूर होऊन कामाच्या नवीन संधी प्राप्त होणार आहेत. मनाची चंचलता बाजूला ठेवून शांत चित्ताने निर्णय घेतल्यास ते खूप लाभदायक ठरतील.