By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:38 IST
1 / 6म्हणतात ना, सुख कमावता येते पण समाधान सगळ्यांनाच मिळते असे नाही. ते उपजत असावे लागते. अंकशाश्त्रानुसार पुढील जन्मतारखेच्या लोकांमध्ये समाधान मानण्याचा गुण उपजतच असतो. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात येणारे लोकही समाधानी आयुष्य जगतात. जो समाधानी असतो तो आपोआप सुखी होतो. अशा सुखी आणि समाधानी माणसाचा सदरा कोणत्या जन्मतारखांकडे आहे ते पाहू. 2 / 6अंकशास्त्रानुसार '३' हा अंक बृहस्पतीचा (गुरु) मानला जातो. हे लोक अत्यंत आशावादी आणि आनंदी असतात. जीवनातील कठीण प्रसंगांतून कसे बाहेर पडायचे, हे त्यांना चांगले ठाऊक असते. त्यांच्याकडे ज्ञानाची आणि कल्पनाशक्तीची कमतरता नसते, ज्यामुळे ते नेहमी प्रगती करत राहतात.3 / 6या अंकाचा स्वामी 'शुक्र' (Venus) आहे. हे लोक प्रेमळ, कौटुंबिक आणि सौंदर्याची आवड असणारे असतात. त्यांच्या आयुष्यात सुख-सुविधांची कमतरता नसते. कुटुंबावर प्रेम करणे आणि त्यांच्याकडून प्रेम मिळवणे यातच त्यांना खरे समाधान मिळते.प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद शोधून ते समाधानी होतात. 4 / 6या अंकाचा स्वामी 'मंगळ' आहे. हे लोक अत्यंत साहसी आणि माणुसकी जपणारे असतात. इतरांना मदत करण्यात त्यांना मोठा आनंद मिळतो. आयुष्यात कितीही संकटे आली तरी ते हार मानत नाहीत आणि अखेर समाधानी यश संपादन करतात.5 / 6तुमची जन्मतारीख कोणतीही असली तरी, अंकशास्त्रानुसार पुढील काही गोष्टी पाळल्यास जीवनात सुख-शांती मिळू शकते. जसे की, आपल्या लकी नंबरनुसार कपड्यांचे रंग निवडल्यास सकारात्मकता वाढते. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला सकारात्मक ऊर्जेसाठी काही बदल करणे फायदेशीर ठरू शकते. आपल्या जन्मतारखेशी संबंधित ग्रहासाठी दान केल्यास मानसिक शांती मिळते.6 / 6समाधानी आयुष्य हे केवळ जन्मतारखेवर अवलंबून नसून ते आपल्या कर्मावर आणि विचारांवरही अवलंबून असते. जन्मतारीख आपल्याला फक्त दिशा दाखवू शकते. अंकशास्त्राचेही प्रयोजन हेच आहे, की व्यक्तीने सुखाबरोबरच समाधानाची कास आणि आस धरली पाहिजे.