बुध तूळ गोचर: ६ राशींना चारही बाजूंनी लाभ, दिवाळी शुभ जाईल; ६ राशींसाठी संमिश्र काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 01:16 PM2023-10-19T13:16:13+5:302023-10-19T13:25:32+5:30

तुमची रास कोणती? तुमच्यावर बुध ग्रहाच्या तूळ राशीतील प्रवेशाचा प्रभाव कसा असेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध कन्या राशीतून तूळ राशीत विराजमान झाला आहे. याच्या एक दिवस आधी नवग्रहांचा राजा सूर्याने तूळ राशीत प्रवेश केला आहे. तूळ राशीत आधीपासून मंगळ आणि केतु ग्रह आहेत. त्यामुळे तूळ राशीत चतुर्ग्रही योग जुळून आला आहे.

बुधच्या तूळ राशीतील प्रवेशामुळे सूर्य आणि बुधचा शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. बुधचा तूळ राशीतील प्रवेश विशेष मानला गेला असून, याचा काही राशींना उत्तम फायदा मिळणार असून, दिवाळीचा कालावधी शुभ जाऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

एवढेच नव्हे तर तूळ प्रवेशानंतर राहु आणि गुरुची थेट दृष्टी बुध ग्रहावर असणार आहे. त्यामुळे बुधचे गोचर आणि एकूणच ग्रहस्थिती ६ राशींना अतिशय उत्तम, लाभदायक ठरू शकेल, तर ६ राशींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. तुमची रास कोणती आणि तुमच्यासाठी बुधचे तूळ गोचर कसे ठरेल? जाणून घेऊया...

मेष: बुधचे तूळ गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढू शकतात. करिअरमध्ये लक्ष केंद्रित करावे लागेल. चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान होऊ शकते. उद्योगपतींना विरोधकांकडून कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल. आर्थिक बाबतीत हे संक्रमण सरासरी असेल. कुटुंबातील नातेसंबंध प्रभावित होऊ शकतात. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वृषभ: आर्थिक बाबतीत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक समस्याही वाढू शकतात. अ‍ॅडजस्टमेंट करून लोकांसोबत जाण्याची गरज आहे. करिअरमध्ये वेळ सामान्य राहील. व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ शकते. जोडीदारासोबतचे कोणतेही गैरसमज नातेसंबंधात तणाव निर्माण करू शकतात. हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.

मिथुन: बुधचे गोचर शुभ ठरू शकेल. नोकरीमध्ये चांगला अनुभव मिळेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. काही लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात प्रयत्न केल्यास अपेक्षित यश मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. पगार वाढल्याने आर्थिक बाजू मजबूत होईल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम वाढेल.

कर्क: जीवनात निराशेचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती थोडीशी कमकुवत होऊ शकते. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. नोकरीच्या ठिकाणी बॉससोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते. व्यवहार करताना काळजी घ्या. नात्यात सुसंवादाचा अभाव राहील.

सिंह: बुध गोचर यशकारक ठरू शकेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. प्रलंबित पैसे मिळून आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशाचा ओघ असेल. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक कारणांसाठी केलेला प्रवास यशस्वी होईल. आर्थिक बाबतीत फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कन्या: आर्थिक आघाडी आणि करिअरमध्ये फायदा होईल. पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकाल. करिअरमध्ये बढती मिळू शकते. आर्थिक बाबतीत स्थिरता येऊ शकेल. जीवनात आनंद वाढेल. कौटुंबिक सदस्यांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक गोड होतील. जीवनात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढेल.

तूळ: बुधाचे गोचर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात फायदेशीर मानले जाते. कुटुंबात आनंद आणि समृद्धी वाढेल. योजना यशस्वी होतील. अनेक स्त्रोतांमधून पैसे कमवू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात यशाचा काळ आहे. अधिक उत्पन्नामुळे संपत्ती वाढेल. नातेसंबंधांच्या बाबतीत भाग्यवान ठरू शकाल.

वृश्चिक: बुध गोचर काहीसे संमिश्र ठरू शकेल. योजना अयशस्वी झाल्यास निराश व्हाल. अधिक चुका होऊ शकतात. जीवनात अनेक अडथळे येऊ शकतात. करिअरच्या दृष्टीने शुभ परिणाम देणार नाही. धनहानी होऊ शकते. जोडीदारासोबतच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या उद्भवू शकतात.

धनु: बुधाचे गोचर प्रत्येक प्रयत्नात यश मिळू शकेल. करिअरमध्ये शुभ संधी मिळतील. सहकाऱ्यांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. व्यवसायात उत्कृष्ट संधी मिळतील. अधिक पैसे कमवण्यात आणि संपत्तीत वृद्धी करण्यात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रभाव वाढेल. मनात सकारात्मक ऊर्जा अनुभवाल.

मकर: बुध गोचराचे शुभ फल मिळू शकेल. योजना यशस्वी होतील. संपत्ती वाढेल. नोकरीच्या शुभ संधी मिळतील. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक बाबतीत वेळ चांगली आहे. पूर्वीपेक्षा जास्त पैसे वाचवू शकाल.

कुंभ: धर्माकडे कल वाढेल. सेवाकार्यासाठी अधिक वेळ द्याल. विरोधकांकडून जोरदार आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. पण सुज्ञ निर्णयांमुळे कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाल. व्यवसायात नवीन धोरण घेऊन काम कराल. यशही मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील.

मीन: ऑफिसमध्ये सहकाऱ्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीमध्ये खूप दडपण असेल. जास्त काम करावे लागेल. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. भागीदारांसोबतच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात. आरोग्याबाबत काळजी घ्या. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.