Maha Shivratri 2022 : महाशिवरात्रीला भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी 'रुद्राभिषेक' रामबाण उपाय, सर्व अडचणी होतील दूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:51 PM2022-02-28T14:51:57+5:302022-02-28T14:59:22+5:30

Maha Shivratri 2022 : 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी रुद्राभिषेक करू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ शकतात.

जीवनात तर समस्या येतच राहतात पण कधी कधी काही लोकांच्या आयुष्यात एवढ्या अडचणी येतात, की संघर्ष करताना ते मोडून पडतात. सर्व प्रयत्नही अयशस्वी होतात. जर तुमच्यासोबत अशी काही समस्या असेल तर महादेवाचा रुद्राभिषेक केल्याने तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते आणि संकटे टळू शकतात.

खरंतर महादेवाचा रुद्राभिषेक केव्हाही करता येतो. पण महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. महाशिवरात्री हा शिव आणि माता पार्वतीच्या उत्सवाचा दिवस आहे.

भोलेनाथ आणि माता पार्वती या दिवशी खूप आनंदी असतात. अशा स्थितीत भक्ताने रुद्राभिषेक केल्यास त्याच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आणि दुःखाचा अंत होतो. मंगळवार 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त जाणून घ्या रुद्राभिषेकाशी संबंधित खास गोष्टी.

रुद्राभिषेक म्हणजे रुद्राचा अभिषेक. यात शिवलिंगावर जल, दूध, पंचामृत, मध, उसाचा रस, तूप किंवा गंगाजलाने मंत्रोच्चार करून अभिषेक केला जातो. शास्त्रात रुद्राभिषेकाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. वेगवेगळ्या समस्यांसाठी रुद्राभिषेक वेगवेगळ्या गोष्टींनी केला जातो.

तुमच्या उद्देशानुसार, ज्योतिषी तुम्हाला वेगवेगळ्या साहित्याने रुद्राभिषेक करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही रुद्राभिषेक कराल तेव्हा भटजींच्या देखरेखीखाली करा म्हणजे तुमचे कार्य पूर्ण शास्त्रातील मान्यतेनुसार पूर्ण होईल.

महादेवाला रुद्राभिषेक अत्यंत प्रिय आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो. जर तुम्ही रुद्राभिषेक करण्याचा विचार करत असाल तर महाशिवरात्रीची तिथी खूप शुभ आहे.

याशिवाय मासिक शिवरात्री, प्रदोष, शुक्ल पक्षातील सोमवार किंवा श्रावण महिन्यात करू शकता. या सर्व तिथी महादेवाला समर्पित मानल्या जातात.

रुद्राभिषेकाने तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते असे म्हटले जाते. भगवान महादेव खूप भोळा असून भक्तिभावाने त्याला पाणी अर्पण केले तरी शिवभोळा भंडारी आनंदी होतो. भक्ताने पूर्ण भक्तिभावाने रुद्राभिषेक केल्यास तो प्रसन्न होऊन त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो.

रुद्राभिषेक केल्याने घरातील आजार, आर्थिक संकट इत्यादी दूर होतात. अपत्य नसलेल्या दाम्पत्याची अपत्याची इच्छा पूर्ण होऊन जीवनात सुख, वैभव व कीर्ती प्राप्त होते.

भगवान शिवाच्या महान उत्सवात महादेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सूर्योदयापूर्वी पहाटे उठून स्नान आणि ध्यानधारणा करुन हे महाव्रत प्रामाणिक मनाने पाळण्याचा संकल्प घ्यावा. यानंतर शिवलिंगाला पंचामृताने स्नान घावाले आणि त्यानंतर आठ कमळ कुंकू जल अर्पण करावे. भगवान शंकराची उपासना करत असताना त्यांच्या पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.