‘गीतारहस्य’कारांचे जीवन रहस्य काय? ‘ती’ गोष्ट तंतोतंत लागू! पाहा, लोकमान्य टिळकांची कुंडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:02 PM2023-07-24T14:02:03+5:302023-07-24T14:02:03+5:30

Lokmanya Bal Gangadhar Tilak Kundli: भारतीय असंतोषाचे जनक, टिळक पंचागकर्ते लोकमान्य टिळकांची कुंडली काय सांगते? जाणून घ्या...

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे ‘गीतारहस्य’कार बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक जहाल मतवादी होते. स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक बाळ गंगाघर टिळक यांनी हजारो लोकांना प्रेरणा दिली आणि लोकांच्या जीवनात अनेक बदल घडवून आणले. केसरी, मराठासारखी वृत्तपत्रे काढली.

भारतीय असंतोषाचे जनक अशी ओळख असणाऱ्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सवातून समाजाचे एकत्रिकरण करून देशकार्यासाठी अनेक महत्त्वाची आणि अनमोल कामे केली. एवढेच नव्हे तर टिळकांनी खगोलशास्त्राचा मोठा अभ्यास करून टिकळ पंचांग पद्धती रुजू केली होती.

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीत झाला. ०१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांनी इहलोकीची यात्रा संपवली. लोकमान्य टिळकांची कुंडली कशी होती, ज्योतिषाशास्त्रात सांगितलेल्या कोणत्या गोष्टी टिळकांना तंतोतंत लागू पडत होत्या, टिळकांचे ग्रहबळ कसे होते? जाणून घेऊया...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या कुंडलीतील लग्नास्थानी कर्क रास आहे. टिळकांच्या कुंडलीत धैर्य आणि निर्भयतेचा कारक मंगळ सुखाच्या स्थानी म्हणजेच चौथ्या स्थानी आहे. मंगळाची कर्म स्थानाकडे म्हणजेच दहाव्या स्थानावर दृष्टि आहे. यामुळेच निर्भीड, साहस, पराक्रम असे गुण टिळकांच्या अंगी ठळकपणाने दिसून येतात, असे म्हटले जात आहे.

लोकमान्य टिळकांच्या जन्मकुंडलीत दशनाथ बुध आणि शनी एकाच बाराव्या स्थानी विराजमान आहेत. शनी हा सार्वजनिक स्थानाचा कारक ग्रह आहे, यामुळेच टिळकांनी जनतेला स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले आणि सामाजिक चळवळीची सुरुवात केली, असे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार जन्मदशानाथ ज्या स्थानी असतो, त्या स्थानाभोवती त्या व्यक्तीचे आयुष्य फिरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आणि हीच बाब लोकमान्य टिळकांच्या जीवनाला तंतोतंत लागू होते, असे म्हटले जाते.

टिळकांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबी पदवी प्राप्त केली. यानंतर एका शाळेत गणित शिकवण्यास सुरुवात केली. चंद्र कुंडलीतून पाचव्या भावात गुरु शनीचा प्रभाव असल्याने कायद्याचे शिक्षण घेतले आणि नंतर अध्यापनही केले, असे म्हटले जात आहे. मात्र, काही कारणास्तव टिळकांना ती नोकरी सोडावी लागली.

लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शुक्रदशेत ४ जानेवारी १८८१ रोजी केसरी नावाचे स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले. तेव्हा लोकमान्य टिळकांच्या कुंडलीतील दशमांश कुंडलीमध्ये लेखन आणि प्रकाशनाच्या पाचव्या स्थानाचा स्वामी शुक्र लग्नस्थानी लेखन आणि संवादाचा कारक बुधाच्या मिथुन राशीत होता.

सन १८९० मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले. विशेषतः स्वराज्याच्या लढ्यासाठी काँग्रेसच्या मवाळ वृत्तीला विरोध केला. लोकमान्य टिळक त्यावेळेच्या सर्वात प्रतिष्ठित जहालवादींपैकी एक होते. स्वदेशी चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मवाळवादी आणि जहालवादी अशी विभागणी झाली होती.

१४ सप्टेंबर १८९७ रोजी चापेकर बंधूंना आयुक्त रँड यांच्या हत्येसाठी चिथावणी दिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना दीड वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली.

तेव्हा शुक्राच्या महादेशत बुधाची अंतर्दशा सुरू होती. या काळात टिळकांना तुरुंगवास भोगावा लागला. या कालावधीत शुक्र बाराव्या स्थानी शनीच्या नक्षत्रात विराजमान होता. तसेच बुध स्वस्थानी होता.

सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.