Alum Astrology Benefits: तब्बल ४ हजार वर्षे जुनी तुरटी ठरु शकते धनवृद्धी, भाग्योदयकारक! ‘हे’ उपाय उपयुक्त; पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 10:35 AM2021-10-27T10:35:19+5:302021-10-27T10:40:50+5:30

Turti Benefits in Marathi: तंत्रशास्त्रानुसार, तुरटीचे काही उपाय आपणासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतात. जाणून घ्या...

सर्वसामान्यपणे गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो, हे आपण अगदी लहानपणापासून पाहतो. आधुनिक काळात अनेक प्युरिफायर बाजार उपलब्ध असले, तरी आजही बहुतांश ठिकाणी तुरटी गढूळ पाण्यावर रामबाण मानली जाते. (Alum Astrology Benefits)

वैज्ञानिक संज्ञेनुसार, हायड्रेटेड पोटॅशियम अ‍ॅल्युमिनियम सल्फेट या संयुगाला मराठीमध्ये तुरटी असे म्हणतात. बॉक्साइट तसेच ॲल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते. तुरटीचे स्फटिक समकोन अष्टकोनाकृती असतात. भाज्या आणि फळे यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. याशिवाय तुरटी जंतुनाशक असल्यामुळे केशकर्तनालयातही प्रामुख्याने वापर केला जातो. (Turti Benefits in Marathi)

तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहिती असल्याचे पुरावे इजिप्तमध्ये आढळले. तसेच भारतीय गणितज्ज्ञ वराहमिहिर यांच्या लेखनात पाचव्या शतकात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे. (fitkari upay)

प्राचीन काळापासून भारतातील सौराष्ट्र प्रदेशात तुरटी तयार केली जात आहे. तुरटीत अनेक औषधीय गुण असले, तरी तंत्र शास्त्रानुसार, तुरटीचे काही उपाय आपणासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतात. जाणून घ्या...

तुरटीला फिटकरी असेही संबोधले जाते. तंत्रशास्त्रानुसार, व्यापार, व्यवसाय, उद्योग, दुकान, कार्यालय अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना करावा लागत असेल, तर एका काळ्या रंगाच्या वस्त्रात तुरटी ठेवून दुकान, कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजून बांधावी.

असे केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते. इतकेच नव्हे तर यामुळे व्यापार, व्यवसाय, उद्योगात प्रगती होताना दिसते. तुरटीच्या या उपायामुळे टप्याटप्याने आपल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

अनेक कुटुंबामध्ये वारंवार कलह होत असतो. भांडणे वाढत जातात. अशावेळी रात्री झोपताना पलंगाखाली एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तुरटीचे तुकडे टाकावेत. सकाळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडापाशी ओतून टाकावे. असे केल्याने कुटुंबातील कलहाचे गढूळ वातावरण स्वच्छ होण्यास सुरुवात होते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.

तंत्रशास्त्रानुसार, नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेल्यावर उत्तम यश मिळावे, यासाठी तुरटीचा उपाय लाभदायक ठरू शकतो. नव्या नोकरीसाठीच्या मुलाखतीला जाताना अपेक्षित यश वा परिणाम साध्य होण्याच्या शक्यता वाढू शकतात, असे सांगितले जाते.

अनेक प्रयत्न करूनही कर्ज फेडण्यासाठी अपेक्षित यश मिळत नाही, अशा वेळी तंत्रशास्त्रात दिलेले तुरटीचे उपाय उपयुक्त ठरू शकतील, असे सांगितले जाते. तंत्रशास्त्रानुसार, तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करावी. तसेच तुरटी आणि मिठाचे पाणी एकत्र करून घराची स्वच्छता केल्यास वास्तुदोष दूर होतो, असे सांगितले जाते.

नकारात्मकता दूर होते. घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संचार होतो, असे सांगितले जाते. काही जणांना वारंवार दृष्ट लागते. अशा लोकांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुरटी फिरवून दृष्ट का तुरटी फिरवताने ती प्रत्येकवेळी तळव्याला लावावी. यानंतर ती तुरटी आगीत टाकून द्यावी. असे केल्याने वाईट नजरांचा परिणाम नगण्य होतो. दृष्ट लागल्यानंतरचा प्रभाव कमी होतो, असे सांगितले जाते.