शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

थोडं थांबा! लवकरच गुरुचे स्थलांतर 'या' पाच राशींना वर्षभरात करणार मालामाल विकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 08:00 IST

1 / 6
गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात हा ग्रह शुभ मानला जातो. तसेच गुरु हा ज्ञान, मान सन्मान, शिक्षण, वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह आहे. गुरु कोणत्याही एका राशीत १३ महिने राहतो. ज्योतिष शास्त्रानुसार १२ एप्रिलला गुरु मीन राशीत प्रवेश करेल. जेव्हा गुरु स्वतःच्या राशीत किंवा दुसऱ्या, पाचव्या, नवव्या आणि बाराव्या भावात प्रवेश करतो तेव्हा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी गुरूचे परिवर्तन फायदेशीर ठरेल.
2 / 6
गुरूचे संक्रमण मेष राशीच्या बाराव्या घरात असेल. परिणामी, वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. यासोबतच कुटुंबात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल. व्यावसायिकाना व्यवसायात लाभाच्या भरपूर संधी मिळतील. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. याशिवाय नशीबही अनेक बाबतीत साथ देईल.
3 / 6
एप्रिलमध्ये गुरु ९व्या भावात प्रवेश करेल. बृहस्पति संक्रमणाचा काळ खूप फायदेशीर सिद्ध होईल. कोणत्याही स्थावर मालमत्तेतून मोठा धनलाभ होईल. व्यावसायिकांचे उत्पन्न वाढेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. तथापि, अनावश्यक प्रवासामुळे आंशिक आर्थिक नुकसान होऊ शकते.
4 / 6
बृहस्पति वृश्चिक राशीच्या पाचव्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
5 / 6
एप्रिल महिन्यात कुंडलीच्या दुसऱ्या भावात गुरुचे भ्रमण होईल. या काळात व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील. तसेच नोकरीत बढतीसोबतच पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ कार्ये होतील. याशिवाय वडिलांच्या संपत्तीतूनही लाभ होऊ शकतो.
6 / 6
गुरूचा हा राशीबदल मीन राशीसाठी खास सिद्ध होईल. खरे तर गुरूचे संक्रमण १२व्या भावात होईल. त्यामुळे परदेश प्रवासाचे योग येतील. यासोबतच धन-संपत्तीही वाढेल. नोकरीत प्रगतीची संधी आहे. व्यवसायात उत्पन्न वाढू शकते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष