शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:33 IST

1 / 15
शुक्र वृषभ राशीत प्रवेश करीत आहे. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- शुक्र व हर्षल वृषभ राशीत, रवि व गुरू मिथुन राशीत, बुध कर्क राशीत, मंगळ व केतु सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि व नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
जुलै महिना खास असणार आहे. एकाच महिन्यात ६ ग्रहांचे गोचर होणार आहे. जुलै महिन्यात १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. पुढील महिनाभर कर्क संक्रांत असणार आहे. यानंतर २६ जुलै रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर, २८ जुलै रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय गुरुचा उदय होणार आहे. तसेच दोन ग्रहांचे नवमपंचम योग जुळून येत आहेत.
3 / 15
जून महिन्यांच्या सांगतेलाच शुक्र ग्रहाने स्वराशीत प्रवेश केला आहे. या सर्वांचा काही राशींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: काही कारणाने कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी समन्वय साधून वाटचाल करणे हितावह राहील. असे केल्याने नात्यात गोडवा निर्माण होईल. आवश्यक खर् सहजपणे करू शकाल. प्राप्तीचे स्रोत शोधण्याचा प्रयत्न कराल. व्यापाऱ्यांना कामांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यापारात एक चांगले ध्येय गाठता येईल. भागीदारीत व्यवसाय करू नये. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या कामासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागू शकते. असे असले तरी निर्णय क्षमतेवर लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. त्यांना अभ्यासात मेहनत वाढवावी लागेल. असे करूनच स्पर्धेत यशस्वी होता येईल. आहारावर लक्ष द्यावे.
5 / 15
वृषभ: विचारपूर्वक सर्व कामे करावी लागतील. विवाहितांनी जोडीदाराशी अहंकाराने वागू नये. क्रोधामुळे त्यांच्या नात्यातील समस्या वाढतील. प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासात घालवलेल्या दिवसांच्या जुन्या आठवणीत रमून नवीन क्षणांचा आनंद लुटतील. पैशांच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. घाईघाईत एखादी आर्थिक गुंतवणूक करू नये. अन्यथा त्यात घोटाळा होऊ शकतो. एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. व्यापारात जुन्या योजनेतून अपेक्षित लाभ न झाल्याने समस्या निर्माण होईल. गोंधळून जाल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो सोडून देऊन आहात तेथेच राहिला, तर ते हितावह होईल. काही दिवसांनंतर एखादी चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहतील. मित्र अभ्यासात विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यापासून काही दिवसांसाठी लांब राहू शकता. एखाद्या नवीन चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
6 / 15
मिथुन: काही जुने वाद संपुष्टात आल्याने नात्यास वेळ देऊ शकाल. प्राप्ती चांगली राहू शकेल. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. त्यातून चांगला परतावा मिळू शकेल. प्राप्तीचे स्रोत वाढविण्यावर लक्ष केंद्रित कराल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल एखादा पुरस्कार मिळू शकतो. वरिष्ठ कामात मदत करतील. विद्यार्थ्यांना मेहनत सुरू ठेवावी लागेल. अभ्यासाच्या बाबतीत त्यांना सतर्क राहावे लागेल. एखादी शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे.
7 / 15
कर्क: विवाहित व्यक्ती कौटुंबिक संबंध सांभाळण्याचा प्रयत्नात राहतील. आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात राहाल. परंतु खर्च खोडा घालतील. तेव्हा अंदाज पत्रकावर लक्ष द्यावे लागेल. एखादी दीर्घकालीन आर्थिक गुंतवणूक केल्यास ती उपुयक्त ठरेल. व्यापारी व्यवसायात काही बदल करतील, जो त्यांच्यासाठी फायदेशीर होईल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारावर नजर ठेवावी. नोकरी करणाऱ्यांना सावध राहावे लागेल. चांगल्या कामगिरीने कार्यक्षेत्रातील काही लोक शत्रू होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम आहे. त्यांना बाहेरगांवी जाऊन शिकण्याची संधी मिळू शकते. त्यांना आवडत्या विषयात प्रवेश मिळू शकतो. अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील.
8 / 15
सिंह: विवाहित व्यक्ती जर नात्यात समन्वय साधू शकले तर जास्त चांगले होईल. कुटुंबियांसह जोडीदाराच्या समस्या समजून घ्याव्या लागतील. आर्थिक नियोजन कराल. शेअर बाजार इत्यादीत जास्तीची आर्थिक गुंतवणूक आपण करू शकता. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेण्याची गरज भासेल. व्यापारासाठी एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक कराल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बराचसा पैसा खर्च कराल. व्यापारात एखाद्या योजनेसाठी बऱ्याचशा पैशांची गुंतवणूक कराल. व्यावसायिक भागीदारांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आनंददायी बातमी मिळेल. नोकरी मिळू शकते. कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याने घाई करू नये. विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी पूर्ण वेळ देऊ शकतील. अपेक्षित परिणाम मिळतील. अभ्यासासाठी बाहेरून ऑफर मिळण्याची संभावना आहे.
9 / 15
कन्या: सकारात्मक परिणाम मिळू शकतील. विवाहित व्यक्ती जोडीदारास वेळ देऊन त्यांच्या भावी योजना समजून घेतील. नाते अधिक दृढ होईल. नोकरी बदलल्यास समस्या निर्माण होण्याची संभावना असल्याने तूर्त तरी त्यात बदल करण्याचा विचार करू नये. विद्यार्थी जोर लावून व भरपूर मेहनत करून त्यांचा अभ्यास करतील. यश प्राप्तीची जास्त शक्यता आहे. काही विषय बदलावयाचे असतील तर त्यानी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्यावा.
10 / 15
तूळ: व्यापारासंबंधित आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांच्या नात्यात जर अनेक दिवसांपासून कटुता निर्माण झालेली असेल तर ती वाढू शकते. नाते तुटण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्ती कौटुंबिक समस्याने त्रस्त होतील. आर्थिक बाबतीत सतर्क राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी एखादा पुरस्कार मिळू शकतो. पगारवाढ मिळू शकते. व्यवसायात एखादी नवीन योजना उपयुक्त होऊ शकेल. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावयाचे आहे ते अर्ज करू शकतात. ज्ञानात भर पडेल अशा एखाद्या विषयात सहभागी व्हाल.
11 / 15
वृश्चिक: प्रगतीदायक काळ आहे. वैवाहिक जोडीदारास नवीन नोकरी लागल्याने विवाहित व्यक्ती प्रसन्न होतील. प्रेमीजनांना नात्यास वेळ देऊन कटुता दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कामात एकाग्रता साधावी लागेल. प्राप्तीचे काही नवीन स्रोत मिळतील. असे असले तरी खर्चात वाढ होऊ शकते. काहीसे तणावाखाली वावरण्याची संभावना आहे. एखादे नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आखू शकता. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामे सहजपणे वेळेवर पूर्ण करू शकतील. कामात वरिष्ठांची मदत घ्यावी लागू शकते.
12 / 15
धनु: वैवाहिक जीवनात काही तणाव असला तर तो दूर करण्याचा प्रयत्न कराल. घरगुती सामान खरेदीवर भरपूर पैसा खर्च कराल. त्यामुळे नंतर पैशांची कमतरता भासू शकते. दीर्घकाळासाठी एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करणे हितावह ठरेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या योजनांवर लक्ष ठेवावे लागेल. अन्यथा इतर लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम मिळेल. पदोन्नती संभवते. आधी एखादी नोकरी सोडली असेल तर तेथून परत बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रता टिकवून ठेवावी लागेल. एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास तो मिळण्याची अपेक्षा बाळगू शकता.
13 / 15
मकर: प्राप्तीच्या दृष्टीने चांगला आहे. विवाहितांनी त्यांच्या जोडीदारास वेळ दिल्याने त्यांच्यातील दुरावा सहजपणे दूर होऊ शकेल. कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कोणाकडून उसने पैसे घ्यायचे असेल किंवा एखादे कर्ज घ्यायचे असेल तर ते सहजपणे मिळू शकेल. प्राप्ती वाढविण्याकडे लक्ष दिल्यास स्रोत वाढतील. परंतु, कोणत्याही कामात मऊपणा दाखवू नये. गरजांवर होणाऱ्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. कदाचित स्थान परिवर्तन होऊ शकते. व्यापाऱ्यांची चांगली प्रगती होईल. व्यवसायासाठी ते एखादी योजना आखतील जी त्यांचा व्यवसाय उंचावण्यास मदतरूप ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात त्यांच्या मनाप्रमाणे परिणाम मिळतील. ते अभ्यासासाठी बाहेर जाऊ शकतात. इच्छा पूर्ण होऊ शकतील.
14 / 15
कुंभ: वैवाहिक जीवनात काही कौटुंबिक समस्या निर्माण होऊन नात्यात कटुता येऊ शकते. प्रेमीजनांना मनातील गोष्ट सांगण्याची संधी मिळेल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. नात्यात एक नावीन्य येईल. प्रॉपर्टीतून आर्थिक प्राप्ती होऊ शकते. खर्चाचा अंदाज घेऊन योजना तयार करावी लागेल. व्यावसायिक व्यक्ती त्यांच्या योजनांमुळे प्रसन्न होतील. व्यापारात प्रगती खुंटलेली असेल तर ती अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात व्यस्त राहिल्याने त्यांचे सहकारी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. काही कारणांमुळे ते त्रस्त होतील, ज्यामुळे त्यांच्या अध्ययनात समस्या निर्माण होईल. एखाद्या कामामुळे टेन्शन येऊ शकते, त्यातून बाहेर पडावे लागेल.
15 / 15
मीन: हा काळ सकारात्मक परिणाम घेऊन येणारा आहे. विवाहित व्यक्तींमधील भांडण मिटू शकते. आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखणे हितावह होईल. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. थकबाकी मिळण्याची संभावना आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. नोकरीतील समस्येतून सुटका होईल. व्यापारी व्यवसायास परदेशात घेऊन जाऊ शकतील. विद्यार्थी इतर कामे सोडून अभ्यासात गर्क होतील. एखाद्या परीक्षेत त्यांना घवघवीत यश प्राप्त होऊ शकेल. कौटुंबिक समस्यांच्या तणावामुळे शरीर काहीसे कमकुवत होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक