Happy Diwali 2025 Wishes: दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:08 IST2025-10-18T13:10:37+5:302025-10-18T14:08:13+5:30
Happy Diwali 2025 Wishes in Marathi: सगळ्या सणांची राणी म्हणजे दिवाळी(Diwali 2025). १७ ऑक्टोबर पासून यंदाचे दीपोत्सव पर्व सुरु झाले आहे, ते २३ ऑक्टोबरला भाऊबीजेपर्यंत सुरु राहील. हा काळ आनंद, उत्साह, चैतन्याचा आणि शुभेच्छा, सदिच्छा प्रदान करण्याचा आहे. म्हणून हे मराठी ग्रीटींग्स आपल्या प्रियजनांना पाठवून, सोशल मीडियाला स्टेटरवर ठेवून द्विगुणित करा.

सण दिवाळीचा, आनंददायी क्षणांचा.. नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या या दिनी सदैव मंगल होवो सर्वांचे हीच कामना मनी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
दारी दिव्यांची आरास, अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदाचे दीप उजळू दे सदैव आपल्या घरी, तनामनावर बरसत राहो चैतन्याच्या सरी, सौख्य, संपदा, समृध्दीला न उरो कदापी उणे दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे हेच एक मागणे... दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा