Gudi Padwa 2022: हिंदू नवे वर्ष बाराही राशींसाठी आर्थिक लाभाचे ठरणार, मात्र आरोग्याच्या तक्रारीही उद्भवणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 04:47 PM2022-03-26T16:47:20+5:302022-03-26T17:03:15+5:30

Gudi Padwa 2022: चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी हिंदू नववर्ष दिन म्हणून ओळखली जाते. या दिवशी गुढी पाडवा हा सणदेखील साजरा केला जातो. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होते. हिंदू दिनदर्शिका ज्या पंचांगावर अवलंबून असते ते पंचांगदेखील या तिथीपासून बदलते. हा बदल ज्योतिष शास्त्राआधारे केला जातो. त्यावरून बाराही राशींचे वर्षभराचे भाकीत वर्तवले जाते. त्याआधारे आपणही जाणून घेऊया की आगामी हिंदू नववर्ष आपल्या राशीसाठी कसे जाणार आहे...

आर्थिक समस्या या वर्षी संपतील. परदेशातून काही नवीन व्यवसाय आणि फायदा होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात काही अडचणी उद्भवू शकतात. चतुर्थ भावात शनीची दृष्टी पडल्याने हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण मिळू शकते, सावधगिरी बाळगा. आजारांमुळे राहू मानसिक तणाव निर्माण करू शकेल. उच्च रक्तदाब, हृदय, मधुमेह इ समस्यांपासून बचावासाठी पूर्वकाळजी घ्या. जानेवारी २०२३ मध्ये शनीच्या राशी बदलाने आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल. हे वर्ष सामान्य लाभाचे राहील.

या वर्षी व्यवसाय आणि नोकरी दोन्हीसाठी चांगला योग बनत आहे. आर्थिक लाभासोबतच खर्चातही वाढ होईल. या वर्षी कोणत्याही प्रकारच्या पत्र व्यवहारात सावधगिरी बाळगा, अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पालकांशी भांडणे टाळा, वियोग होण्याची शक्यता आहे. शारीरिक दुर्बलता आणि तणावामुळे वैवाहिक संबंध उदासीन होऊ शकतील. शैक्षणिक क्षेत्रात सामान्य कामगिरी कराल, परंतु आता केलेल्या संघर्षाचा नोव्हेंबरपासून लाभ मिळेल. पालकांना आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. काळजी घ्या. वर्ष चांगले बदल घेऊन येईल.

या वर्षी नशीब तुमच्या पाठीशी आहे, व्यवसायात वाढ होण्यासोबतच तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढती होईल. या वर्षी कौटुंबिक वारसाहक्कातून आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात उत्साह राहील. या वर्षी तुमचे नशीब तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात, विशेषतः आयटी, मानसशास्त्र आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात साथ देईल. निद्रानाश, मासिक पाळीशी संबंधित आजार आणि त्वचेचे आजार अशा गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. तुमच्याकडून श्रद्धा आणि सबुरी बाळगा निश्चित लाभ मिळेल.

या वर्षी सप्तम भावातील शनि तुमच्या कामात विलंब लावेल. ऑगस्टपर्यंत आर्थिक समस्या असतील, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. या वर्षी कुटुंबात नवीन सदस्याची भर पडल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल. निद्रानाश, सांधेदुखी, त्वचारोग, हृदय व गुप्तांगांशी संबंधित आजार तसेच संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. एखाद्या किरकोळ अपघातामुळे पाय दुखू शकतात. या वर्षात तब्येतीची विशेष काळजी घ्या.

या वर्षी तुम्हाला विशेष आर्थिक लाभ मिळेल. परदेश दौऱ्यांमधूनही तुम्हाला कार्यक्षेत्रात लाभ मिळेल. एखादा सहकारी तुमची प्रतिष्ठा खराब करू शकतो, सावधगिरी बाळगा. मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध चांगले होतील, सुधारतील. या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात नशीब साथ देईल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. या वर्षी तुम्ही उच्च रक्तदाब आणि मधुमेह आणि श्वसनाशी संबंधित आजारांमुळे त्रस्त असाल. आरोग्याची काळजी घ्या.

या वर्षी आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे मन काहीसे अस्वस्थ राहील. कुटुंबात भांडण होण्याची शक्यता आहे. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. धार्मिक क्षेत्रात योगदान दिल्याने मन भक्तीमय होईल. कृषी विज्ञान, आयटी, नागरी सेवा, पत्रकारिता किंवा अध्यापनाच्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला काळजी वाटेल.

या वर्षी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु जून महिन्यानंतर सहकाऱ्यांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबात अशांतता राहील, जरी जुलैपासून परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला कुटुंबाचे प्रेम मिळेल. आईच्या आरोग्याच्या समस्या उद्भवतील. विशेषत: पचन आणि गुप्तांगांशी संबंधित आजारांमुळे तुम्हाला त्रास होईल. आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने काळजी घ्या. हे वर्ष चांगले जाईल.

या वर्षी सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. भावनिक प्रसंगी बोलण्यापूर्वी थोडा विचार करा म्हणजे तुम्ही इतरांना दुखवणार नाही. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले असणार आहे. एकीकडे तुमच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती होईल, पगार वाढेल तसेच अडकलेला पैसाही परत येईल. शिक्षणासाठी हे वर्ष सामान्य आहे. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. हृदय, सांधेदुखी, मायग्रेन, ल्युकोरिया इत्यादी आजारांबाबत जागरुक राहण्याची गरज आहे.

या वर्षी तुम्हाला वरिष्ठ अधिका-यांचा आशीर्वाद मिळेल, त्यानंतर जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळेल. परदेशातून किंवा अज्ञात व्यक्तीकडून धनलाभ होईल. प्रशासकीय परीक्षा असो वा अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय परीक्षा, राहू तुम्हाला सर्वांमध्ये यश देईल. जुने आजार दूर होतील. या वर्षी कोणतीही मोठी समस्या नसली तरी पंचमातील राहू तुम्हाला पोटाचे विकार देऊ शकतो. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या.

तुमच्या कार्यक्षेत्रात उच्च अधिकार्‍यांकडून प्रशंसा सोबतच आर्थिक लाभही मिळतील. जुलैनंतर खर्चामुळे चिंताग्रस्त होऊ शकता. आई आणि पत्नीच्या तब्येतीची चिंता राहील. बाहेरच्या व्यक्तीमुळे वैवाहिक जीवनात थोड्या कुरबुरी होतील. तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर मे ते नोव्हेंबर दरम्यानचा काळ उत्तम असेल. वाताचे विकार होऊ शकतात. न्यूनगंड बाळगू नका अन्यथा नैराश्यात अडकून राहाल. आत्मविश्वासाने सामोरे गेलात तर हे वर्ष आनंदाने पार पाडाल.

या वर्षी आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळण्याचा प्रयत्न करा. मानसिक तणावामुळे वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. लहान भावंडांचे सहकार्य मिळेल. या वर्षी तुम्ही उच्च रक्तदाब, मधुमेह,श्वसन तसेच पोटाचे विकार होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सामान्य आहे. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.

या वर्षी आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु प्रवास करताना काळजी घ्या. प्रवासाच्या दृष्टीने यावर्षी अनेक ठिकाणी तीर्थाटणाचे योग आहेत.