By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 10:54 IST
1 / 8दसऱ्याला आपण वाहनांची, शस्त्राची, वह्या पुस्तकांची पूजा करतो आणि त्यात वृद्धी व्हावी अशी प्रार्थना करतो. ही प्रार्थना पूर्णत्त्वास जावी, यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय दिले आहेत. दसऱ्याच्या सायंकाळी गुपचूप हे उपाय केले असता देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांचा कृपावर्षाव तुमच्यावर सदैव राहतो. 2 / 8दसऱ्याला विजयादशमीचा सण असेही म्हणतात. याच दिवशी श्रीरामाने रावणावर विजय मिळवला. देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे हा विजयोत्सव साजरा केला जातो. तसेच आपल्यालाही दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा यावर विजय मिळवून ज्ञानाची कास धरता यावी यासाठी पूजा आणि प्रार्थना केली जाते. 3 / 8यंदा दसरा २ ऑक्टोबर रोजी आहे आणि त्यादिवशी गुरुवार आहे. त्यानिमित्त दर गुरुवारी जो पिवळ्या कापडाचा उपाय सांगितला जातो, तोच उपाय दसऱ्यालाही करा असे सांगितले जाते. पिवळ्या कापडात एक पाण्याने भरलेला नारळ गुंडाळून तो एखाद्या राम किंवा देवीच्या मंदिरात जाऊन ठेवावा आणि आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी प्रार्थना करावी. पिवळा रंग हा यश, वैभव, ऐश्वर्य याचे प्रतीक आहे. तर श्रीफळ अर्थात नारळ हे संपन्नतेचे प्रतीक आहे. 4 / 8कर्जमुक्तीसाठी दसऱ्याच्या दिवशी हनुमानाची उपासना करावी. ११ वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे आणि हनुमान आणि श्रीराम मंत्राचा जप करून कर्जमुक्ती व्हावी म्हणून प्रार्थना करावी. रामभक्त हनुमान तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग दाखवतील आणि कर्जमुक्तीसाठी मदत करतील. 5 / 8शनिदोष आणि कुंडली दोष दूर करण्यासाठी दसऱ्याला शनी मंदिरात जाऊन राईच्या तेलाचा दिवा लावा आणि काळे तीळ, उडीद डाळ आणि रुईच्या पानांचा हार शनिदेवाला अर्पण करा. दसऱ्याच्या शुभ मुर्हूतावर केलेला हा उपाय सकारात्मक परिणाम देतो. 6 / 8आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर दसऱ्याला शस्त्र पूजा, वही पुस्तकाच्या पूजेबरोबरच लक्ष्मी माता आणि कुबेर महाराज यांची तसबीर ठेवून त्यांची पूजा करा. यथाशक्ती गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. गूळ-खोबरे, साखर फुटाणेही चालतील. पूजेत एक श्रीफळ ठेवा आणि पूजा झाल्यावर तुमच्या कपाटात, तिजोरीत अथवा जिथे पैसे ठेवता त्याठिकाणी ते श्रीफळ ठेवा. नारळ आतून कोरडा झाला की त्याच्या पुढच्या शुक्रवारी दुसरा नारळ ठेवा आणि बदल घडेपर्यंत उपाय करत राहा. आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून प्रार्थना करा. 7 / 8दसऱ्याला रावण दहन केले जाते. त्याच दिवशी एक नारळ रावणाचे प्रतीक मानून दहन करा. नारळाच्या शेंड्यांची राख झाली की ती घराच्या चारही कोपऱ्यात टाका. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जेने घर भरून जाईल व धन-समृद्धी नांदेल. 8 / 8जर घरात कोणी आजारी असेल किंवा अडचणींचा सामना करत असेल तर त्या व्यक्तीवर दसऱ्याच्या सायंकाळी २१ वेळा नारळ फिरवा आणि तो नारळ रावण दहनाच्या अग्नीत टाका. असे केल्याने आजारपण आणि त्रास दूर होतो असे मानले जाते.