Dussehra 2021 : दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार दिलेले उपाय करा आणि 'विशेष' लाभ मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 06:09 PM2021-10-14T18:09:42+5:302021-10-14T18:18:52+5:30

Dussehra 2021 : विजयादशमीचा सण वाईटावर चांगुलपणाने विजय मिळवण्याचा सण आहे. दसऱ्याच्या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला. म्हणून या दिवशी आपणही श्रीरामाचे तसेच देवीचे पूजन करतो. काळ बदलला पण समाजातला आणि मनामनातला रावण अद्याप पूर्ण मेलेला नाही. त्या दुष्प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय संबंधित राशींच्या व्यक्तींनी अनुसरले तर त्यांना निश्चित लाभ होईल.

मेष राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी गणपतीची पूजा करावी व गणरायाला लाडू आणि दुर्वा अर्पण कराव्यात.

वृषभ राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करावी. कारण रावणाशी लढण्यापूर्वी श्री रामानेही शिवाची पूजा केली होती.

दसऱ्याच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी महिषासुरमर्दिनीच्या दिव्य रूपाची पूजा करून महिषासुर मर्दिनी स्तोत्राचे पठण करावे.

कर्क राशीच्या लोकांनी दसऱ्याला दुर्गा मातेच्या किंवा काली मातेच्या देवळात जाऊन दर्शन घेतले पाहिजे.

दसऱ्याच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी गरजूंना अन्नदान तसेच वस्त्रदान करावे.

कन्या राशीच्या लोकांनी शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि यशाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून रामरक्षा म्हणावी.

तूळ राशीच्या लोकांनी दसऱ्याला हनुमंताची पूजा आणि उपासना करावी.

वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी अन्नदान करणे लाभदायक ठरेल.

धनु राशीच्या लोकांनी गणपतीला लाडू अर्पण करून त्याची पूजा करावी.

मकर राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी गरिबांना अन्नदान केल्यास त्यांची साडेसातीची पीडा कमी होईल.

कुंभ राशीच्या लोकांनी दसऱ्याला दुर्गेचे दर्शन घेऊन दुर्गा स्तोत्र म्हणावे.

मीन राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी ११ वेळा रामरक्षा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करावे.