तुळशीचं 'असं' रोप घरात ठेवू नका, लक्ष्मी येणं थांबेल!; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 07:18 PM2022-02-22T19:18:33+5:302022-02-22T19:24:54+5:30

तुळस हा तर हिंदू संस्कृतीचा जीव की प्राण! तिचे धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. तुळीशीचं रोप नेमकं कसं असावं हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे.

तुळस नेहमीच धार्मिक आस्थेचं केंद्र राहिली आहे. जवळपास सर्वच पुजा आणि धार्मिक विधींमध्ये तुळशीपत्र वापरलं जातं. ज्या दाम्पत्याला अपत्याचं सुख मिळू शकलेलं नाही अशा दाम्पत्यानं तुळशीची पुजा करावी असं म्हटलं जातं. तुळस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तुळशीपत्र अर्पण केल्यानं भगवान विष्णू प्रसन्न होतात.

शास्त्रानुसार भगवान विष्णू तुळशीचं म्हणणं कधीच टाळत नाहीत. त्यामुळे तुळस प्रसन्न झाल्यास घरातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात. त्यामुळे तुळशी पूजनात नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

शास्त्रानुसार काही ठराविक दिवस तुळशीचं पान तोडणं टाळलं पाहिजे. रविवार, एकादशी, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या काळात तुळशीची पानं तोडू नयेत. याशिवाय, कोणत्याही कारणाशिवाय तुळशीची पानं तोडली गेल्यास दोष निर्माण होतो आणि लक्ष्मी माता देखील दुखावली जाते.

संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या दिवा लावल्यानं लक्ष्मी माता प्रयत्न होते आणि तिच्या कृपेनं कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. घराच्या अंगणात तुळशीचं रोप लावल्यानं वास्तू दोष दूर होतात. वास्तुशास्त्रातील माहितीनुसार तुळशीचं रोप नकारात्मक ऊर्जा नष्ट करते.

तुळशीच्या रोपानं घरात नेहमी धनसंपत्ती नांदते. इतकंच नव्हे तुळशीचं रोप वाईट नजरेपासून कुटुंबाचं रक्षण करते असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे.

तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते. आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे वृंदावन असे. मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे. परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते.

तुळशीचं सुखलेलं रोप घरात किंवा अंगणात ठेवणं अशुभ मानलं जातं. घरातील तुळशीचं रोप जर सुखलं तर ते नदी किंवा तलावात विसर्जित करावं असं सांगितलं जातं.

कुंडीतून पाणी झिरपेल अशा बेताने दोन छिद्र पाडावीत. तुळशीचे र लावताना कुंडीमध्ये सर्वात खाली वाळूचा एक थर पसरवून घ्यावा. तसेच भुसभुशीत माती, वाळू आणि कोरडे शेण एकत्र करून कुंडीत पसरवून घ्यावा. यात मातीचे प्रमाण सत्तर टक्के, वाळूचे प्रमाण पंधरा टक्के आणि शेणाचे प्रमाण पंधरा टक्के असावे.

तुळशीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. अपुऱ्या सूर्य प्रकाशाअभावी तुळशीचे रोपटे मलूल होते आणि त्याची अन्न निर्मिती प्रक्रिया थांबते. काही काळातच रोपटे मान टाकते. म्हणून तुळशीचे रोप सूर्य प्रकाश मिळेल अशा जागी लावावे.

तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकावा. मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पाने अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक बहरते, फोफावते.