देव दिवाळी २०२५: ९ राशींना शुभ-लाभ, मनासारखे यश; ठरलेली कामे होतील, पैसा मिळेल, पण मोह टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 07:07 IST
1 / 15Dev Diwali November 2025: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देव दिवाळी किंवा देव दीपावली साजरी केली जाते. यंदा शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी देव दिवाळी आहे. सर्व देवदेवतांचे स्मरण हा देव दिवाळी सणाचा हेतू असतो. प्रांतवार सणांचे महत्त्व वेगवेगळे असते. 2 / 15Dev Deepavali November 2025: उत्तर भारतात त्रिपुरी पौर्णिमेला भगवान महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचा वध केला होता म्हणून तो विजयोत्सव देवदिवाळी म्हणून साजरा करतात, तर महाराष्ट्रात मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते, कारण त्यादिवशी खंडोबाचे षडरात्र अर्थात सहा दिवसांचा उत्सव सुरू होतो, तो चंपाषष्ठीला संपतो, म्हणून या उत्सवाला देवदिवाळी संबोधून ती साजरी करतात. 3 / 15यंदाच्या देवदीपावली या दिवशी हंस महापुरुष, रुचक, बुधादित्य, आदित्य मंगल, महालक्ष्मी असे अनेक राजयोग जुळून येत आहेत. या अद्भूत शुभ योगात असलेल्या देव दिवाळीचा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? सर्व बारा राशींवरील प्रभाव जाणून घेऊया...4 / 15मेष: काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. सुरुवातीला योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. उत्तरार्धात काळजी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाची कामे रखडली जातील. लोकांना अवास्तव आश्वासने देऊन शब्दात अडकू नका. प्रवास शक्यतो टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.5 / 15वृषभ: अनुकूलता बाजूने राहील. प्रारंभी मोठ्या उत्साहात एखाद्या प्रकल्पावर काम कराल. त्यात यशही मिळेल. मात्र, गोपनीयता न बाळगल्यास कामात काही अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. कुणी चुकीचा सल्ला देईल. अडचणी दूर होतील. मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे.6 / 15मिथुन: महत्त्वाच्या कामात लोकांची चांगली साथ मिळेल. त्यामुळे यशस्वी व्हाल. कामाचा ताण मुत्सद्दीपणाने हाताळा. मनासारखे यश मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. सामाजिक प्रतिमा उजळेल. अडचणी येतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. योजना लोकांना सांगण्याचा मोह कटाक्षाने आवरा.7 / 15कर्क: प्रगती होईल. चंद्राचे भ्रमण अनुकूलता दर्शवते. ठरविलेले प्रत्येक कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. उच्च पद मिळू शकते. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. मुले प्रगती करतील, मान-सन्मान प्राप्त होईल.8 / 15सिंह: चंद्राचे भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरेल. वडिलोपार्जित संपत्ती, व्यवसाय, नोकरी, मुलांची प्रगती आदी बाबतीत अनुकूल फळे मिळतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. महत्त्वाच्या कामात सिंह पहिल्या टप्प्यात सफलता मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. त्या दृष्टीने थोडे सावध राहा. नोकरीत अनुकूल बदल होतील, बदलांकडे सकारात्मक पद्धतीने बघा.9 / 15कन्या: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. त्यामुळे महत्त्वाची कामे झटपट आटोपून घ्या. नोकरीत थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. भेटवस्तू मिळेल. एखाद्या उलाढालीत फायदा होईल. मात्र, काही अडचणी येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.10 / 15तूळ: चंद्र भ्रमणामुळे सुरुवातीला काही अडचणी असतील. मात्र, थोडे संयमाने वागल्यास अडचणी दूर होण्यास वेळ लागणार नाही. खूप घाईघाईत निर्णय घेऊ नका. परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. हलके वाटेल. स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. एवढ्या तेवढ्या कारणावरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.11 / 15वृश्चिक: एखादी चांगली बातमी कळेल. पैसा मिळेल. तो खर्च करून टाकण्याकडे कल राहील. महागड्या वस्तू, चैनीच्या वस्तू यांची खरेदी कराल. आर्थिक व्यवहारात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. मंजूळ वाणीत येणाऱ्या फोन कॉल्सला भुलून गोपनीय माहिती, पासवर्ड, ओटीपी देण्याचा मोह आवरा. त्या दृष्टीने सावध राहा. प्रेमात असणाऱ्यांनी सावध राहावे.12 / 15धनु: कार्यक्षेत्रात थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. कामाचे स्वरूप बदलेल. घरातील प्रलंबित कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. मात्र थोडे सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. काही अडचणी येऊ शकतात. नियमानुसार कामे करा. फोनवरून बोलताना 'ओटीपी', 'पासवर्ड', 'पीन' कुणाला देऊ नका.13 / 15मकर: चंद्राचे भ्रमण शुभ फळे देणारे ठरेल. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होईल. समोरील अनेक अडचणी दूर होतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पगारवाढ व उच्च पद प्राप्ती होईल. घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या समारंभाचे आयोजन केले जाईल. आर्थिक लाभ होतील. मात्र व्यवहार काळजीपूर्वक करा. कागदपत्रे वाचूनच सही करा.14 / 15कुंभ: मनासारखे घडेल. थोडी दगदग होईल. मात्र शांत चित्ताने व खंबीरपणे वाटचाल सुरू ठेवा. नशिबाचा कौल बाजूने राहील. चांगल्या बातम्यांमुळे उत्साह वाढेल. समाजात मान वाढेल. कलाकार मंडळींना पुरस्कार जाहीर होतील. पर्यटनाच्या संधी मिळतील. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. ओळखीचे फायदे होतील.15 / 15मीन: अचानक धनलाभ होऊ शकतो. संयमाने वागण्याची गरज आहे. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. बेपर्वाई नको. लोकांना अवास्तव आश्वासने देऊ नका. वाहने जपून चालवा. काही अडचणींचे निराकरण होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल परिस्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. जनसंपर्क चांगला राहील. मात्र, काही लोक चुका काढण्याचा प्रयत्न करतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.