२ राजयोगात बुध वक्री-शुक्र अस्त: ११ राशींना दुप्पट लाभ, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन-पगारवाढ योग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:14 IST
1 / 15आताच्या घडीला मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशानंतर बुध आणि शुक्र यांच्या युतीने बुधादित्य आणि शुक्रादित्य असे दोन राजयोग जुळून येत आहेत. तसेच बुध वक्री होत आहे. १९ मार्च रोजी शुक्राचा अस्त होणार असून, अस्तंगत शुक्राचा उदय २३ मार्च रोजी होणार आहे.2 / 15मीन ही बुधाची नीचेची रास आहे. या राशीत बुध वक्री झालेला आहे. तर शुक्राची उच्च रास आहे. १८ मार्च रोजी हर्षल मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करीत आहे. तेथे त्याची युती गुरूशी होईल. मंगळ मिथुन राशीत, केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, तर शनि कुंभ राशीत आहेत. रवी, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.3 / 15एकंदरीत ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींना बुधादित्य, शुक्रादित्य राजयोग, बुध वक्री, शुक्र अस्त आणि उदय तसेच सूर्य आणि केतु यांचा समसप्तक योग यांचा कसा लाभ होऊ शकेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: करिअरच्या क्षेत्रात खूप फायदे मिळू शकतात. बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा एकदा सुरू होईल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. भागीदारीत केलेल्या व्यवसायात काही समस्या येऊ शकतात. पण कालांतराने यावर उपाय निघेल. चांगल्या संधी मिळतील. याचा फायदा घेण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. कामाच्या मार्गात येणाऱ्या अडचणींना संयमाने तोंड द्यावे लागेल. रणनीती आणि योग्य नियोजन करून व्यवसायात उतरावे लागेल. शुभ फळे मिळतील.5 / 15वृषभ: मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्ग एक मोठा व्यावसायिक करार करू शकतो. जो भविष्यात फायदेशीर ठरेल. गुंतवणूक करण्याचा विचार फायदेशीर ठरेल. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. वरिष्ठ अधिकारी कामावर खूष होऊ शकतील. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी योजना उपयुक्त ठरू शकतात. मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो.6 / 15मिथुन: कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता असेल. बिघडलेले काम पूर्ण करू शकाल. सततचा ताण कमी होईल. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. व्यापाऱ्यांना चांगले ऑर्डर मिळून नफा होऊ शकतो. सुख-समृद्धी-सौभाग्य प्राप्त होऊ शकेल. करिअरमध्ये उत्तम लाभ मिळू शकतील. पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतील.7 / 15सिंह: आत्मविश्वास वाढू शकेल. नोकरी करणाऱ्यांना करिअरच्या क्षेत्रात भरपूर फायदे मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रात जास्तीत जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन चांगले राहणार आहे. एकमेकांवरील विश्वास कमकुवत होऊ देऊ नका. मनासारखे यश मिळण्याची शक्यता आहे. सत्ता किंवा सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आगामी काळ चांगला ठरू शकतो. लोकप्रियता वाढू शकेल.8 / 15कन्या: अपेक्षित यश मिळू शकेल. आळस येऊ देऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी दिलासा मिळू शकेल. वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही सहकार्य मिळेल. काही धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदार कठीण काळात मदत करेल.9 / 15तूळ: भाग्याची साथ मिळू शकेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. यासोबतच, संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच, कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. जोडीदारासोबत असलेल्या समस्याही संपुष्टात येऊ शकतात.10 / 15वृश्चिक: कारकिर्दीत प्रगती दिसून येऊ शकेल. नोकरी करत असाल तर भरपूर फायदे मिळू शकतात. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतील. या काळातअचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थी असाल तर शैक्षणिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता येऊ शकेल. 11 / 15धनु: भौतिक सुखे मिळू शकतात. काही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. त्याच वेळी, आर्थिकदृष्ट्या हा काळ खूप चांगला जाईल. समाजात आदर आणि सन्मान मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही खूप फायदे मिळू शकतात. सध्याच्या नोकरीत नशीबाची साथ मिळेल. पदोन्नतीसोबत चांगली पगारवाढही मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. मोठी ऑर्डर मिळू शकते. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. यामुळे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल.12 / 15मकर: धैर्य आणि शौर्य वाढेल. तसेच या काळात आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे मानसिक स्थिरता मिळेल. ऊर्जेने आणि कार्यक्षम नेतृत्वाने कठीण परिस्थितींवर सहज मात कराल. धर्म आणि अध्यात्मात रस वाढेल. भावंडांचा पाठिंबा मिळेल. तसेच, या काळात इच्छा पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.13 / 15कुंभ: कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाईल. करिअरच्या क्षेत्रातही खूप फायदे मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा मिळणार आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा खूपच चांगला असेल. कारकिर्दीत अनेक चांगल्या संधी मिळतील. शुभचिंतकांचे सहकार्य मिळेल. मान-सन्मान वाढू शकेल. 14 / 15मीन: काम करण्याची पद्धत सुधारेल. तसेच आत्मविश्वास वाढेल. उत्पन्न वाढेल. तसेच, या काळात कुटुंबासोबत बराच वेळ घालवाल. या काळात कामाच्या ठिकाणी यश मिळेल. यासोबतच, सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काही विशेष संधी पाहायला मिळतील. प्रवास फायदेशीर ठरू शकतील.15 / 15- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.