शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुध मार्गी: ‘या’ राशींना कमाईत लाभ, नोकरी-बिझनेसमध्ये भरभराट; सुख-समृद्धीत वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 09:59 IST

1 / 9
नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध आताच्या घडीला मेष राशीत विराजमान आहे. मेष राशीत असलेला बुध काही दिवसांपूर्वी अस्तंगत तसेच वक्री झाला होता. यानंतर १० मे रोजी अस्तंगत असलेला बुधाचा उदय झाला आहे. आता १५ मे रोजी वक्री असलेला बुध याच राशीत मार्गी होत आहे.
2 / 9
मेष राशीत बुधाचे मार्गी होणे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने महत्त्वाचे मानले जात आहे. बुध मार्गी होण्याचा काही राशीच्या व्यक्तींना चांगला लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. मेष राशीत मार्गी होत असलेला बुध ०७ जून रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
3 / 9
आताच्या घडीला बुधासोबत गुरु आणि राहु मेष राशीत विराजमान आहेत. एकंदरीत ग्रहमान पाहता कोणत्या राशीच्या व्यक्तींना गुरुचे मार्गी होणे लाभदायक ठरू शकेल? नोकरी, बिझनेसमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतील, आर्थिक आघाडीवर लाभाचे प्रमाण वाढू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचे मार्गी होणे करिअर आणि आर्थिक बाबतीत यशकारक ठरू शकते. प्रगतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकेल. इच्छा पूर्ण होऊ शकतील. शिक्षणाच्या बाबतीत अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतील. नशिबाची साथ मिळू शकेल. व्यवसायात प्रगती होऊ शकेल. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारू शकतील.
5 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना बुधचे मार्गी होणे अनुकूल ठरू शकते. हाती घेतलेल्या कामात शुभ परिणाम मिळू शकतील. चांगली बातमी ऐकायला मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. पालकांशी संबंध सुधारू शकतील. नोकरीच्या बाबतीतही यश मिळू शकेल. दुसर्‍या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. काही वरिष्ठ कारकीर्द पुढे नेण्यात मदत करू शकतात. आजूबाजूचे वातावरण आनंदाने भरलेले असेल. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना बुधचे मार्गी होणे यशकारक ठरू शकेल. आर्थिक बाबतीत यश मिळू शकेल. बढती मिळण्याची शक्यता आहे. चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. आधी शेअर बाजारात केलेली गुंतवणूक आता तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते. व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळू शकते. मेहनतीचे अनुकूल फळ मिळू शकेल. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
7 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना बुधचे मार्गी होणे प्रगतीकारक ठरू शकेल. करिअरमध्ये यश मिळण्याची शुभ शक्यता आहे. संपत्ती वाढू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. नोकरी आणि व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या बोलण्यात अडकून घरातील वातावरण खराब करू नका.
8 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधचे मार्गी होणे यशकारक ठरू शकेल. करिअरमध्ये अपेक्षित संधी मिळू शकतात. सामाजिकदृष्ट्या सक्रिय होऊ शकाल. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढू शकतील. पैसे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सकारात्मक काळ राहू शकेल. जोडीदारासोबत प्रेम वाढू शकेल. एखाद्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये विशेष लाभ मिळू शकतो.
9 / 9
बुध, गुरु, राहुसोबत मेष राशीत नवग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत विराजमान आहे. मे महिन्याच्या मध्यावर सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या संक्रमणाला वृषभ संक्रांत म्हटले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य