शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Astrology: 'अच्छे दिन' येण्यापूर्वी मिळतात 'हे' शुभ संकेत; ओळखा तुमच्या आयुष्यातील ६ दैवी बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:02 IST

1 / 7
सद्यस्थितीत युद्ध जन्य स्थितीमुळे सगळ्यांनाच बुरे दिन येतात की काय अशी धास्ती वाटत आहे. मात्र ज्योतिष शास्त्रात दिलेल्या या गोष्टी तुमच्या आयुष्यातील कठीण दिवस आता संपणार आहेत आणि भाग्योदय होणार आहे, हे ओळखण्यासाठी शुभ संकेत देतील
2 / 7
जर तुमची झोप रोज पहाटे ३:०० ते ५:०० च्या दरम्यान कोणत्याही अलार्मशिवाय उघडत असेल, तर हा सर्वात मोठा शुभ संकेत मानला जातो. या वेळेला 'ब्रह्ममुहूर्त' म्हणतात. असे मानले जाते की, जेव्हा दैवी शक्ती तुमच्यावर प्रसन्न असतात आणि तुम्हाला काहीतरी मोठे यश मिळवून देणार असतात, तेव्हा त्या तुम्हाला या पवित्र वेळी जागृत करतात. ही वेळ तुमची अध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी सर्वोत्तम असते.
3 / 7
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला वारंवार स्वप्नात देवाच्या मूर्ती, भव्य मंदिरे, दिवे किंवा गंगेसारख्या पवित्र नद्या दिसत असतील, तर समजा की तुमचे वाईट दिवस आता मागे सुटले आहेत. हे संकेत दर्शवतात की तुमच्यावर देवाची कृपा झाली आहे आणि तुमच्या आयुष्यातील समस्यांचे निवारण लवकरच होणार आहे.
4 / 7
कधीकधी बाह्य परिस्थितीत कोणताही मोठा बदल झालेला नसतो, तरीही आपल्याला आतून खूप हलके आणि प्रसन्न वाटू लागते. मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार अचानक कमी होतात. जेव्हा तुमची 'वाइब्रेशन्स' (Vibrations) नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळतात, तेव्हाच हे घडते. हे लक्षण आहे की तुमचे नशीब आता तुम्हाला साथ देणार आहे.
5 / 7
हिंदू संस्कृतीत गायीला अत्यंत पवित्र मानले जाते. जर तुमच्या घराच्या दाराशी किंवा खिडकीपाशी वारंवार गाय येऊ लागली किंवा ती तिथे येऊन हंबरू लागली, तर ते घरातून नकारात्मकता बाहेर पडण्याचे आणि लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे. गायीला काहीतरी खायला दिल्यास तुमचे अडकलेले काम मार्गी लागू शकते. तसेच भारद्वाज पक्षाची जोडी दिसणेही लाभदायी ठरते.
6 / 7
लहान मुले ही देवाचे रूप मानली जातात. असे म्हणतात की, लहान मुले मानवाभोवती असलेले 'ऑरा' (Aura) किंवा ऊर्जेचे कवच सहज ओळखू शकतात. जर रस्त्यात किंवा शेजारी एखादे लहान बाळ तुम्हाला पाहून आनंदाने हातपाय हलवत असेल किंवा हसत असेल, तर समजा की तुमची सकारात्मक ऊर्जा खूप वाढली आहे. हे तुमच्या प्रगतीचे लक्षण आहे.
7 / 7
तुम्ही घराबाहेर पडल्यावर किंवा कामात असताना अचानक कुठूनतरी मधुर भजन ऐकू येणे, एखाद्याच्या बोलण्यातून देवाचा संदर्भ येणे किंवा मोबाइलवर अचानक देवाचे चित्र दिसणे, हे योगायोग नसतात. हे 'युनिव्हर्स' (Universe) कडून मिळणारे संकेत आहेत की ईश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष