Astrology: हिंदू नववर्षात होणार राजकीय उलथापालथ, वाढणार महागाई आणि बरेच काही; वाचा तज्ज्ञांचा होरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 04:35 PM2024-04-09T16:35:21+5:302024-04-09T16:39:52+5:30

Astrology of new year: आज गुढीपाडवा तथा चैत्र शुद्ध प्रतिपदा. आजपासून हिंदू नववर्ष सुरू होते. सध्या हिंदू नववर्ष २०८० सुरू आहे, ज्याचा राजा आणि कृषी आणि अन्न मंत्री बुध, गृहमंत्री शुक्र, अर्थमंत्री सूर्य, संरक्षण मंत्री गुरू आहे. राजा बुध, मंत्री शुक्र आणि मेघेश गुरु. हे क्रोधी नाम संवत्सर सुरु झाले आहे. संवत्सराच्या नावावरून आगामी काळ कसा असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. याबाबतीत ज्योतिष तज्ज्ञ काय सांगतात ते पाहू!

हवामान: भारतात २०२४ मध्ये कमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल तर काही ठिकाणी दुष्काळ पडू शकतो. उन्हाळा सामान्य असेल पण पाऊस आणि थंडी वाढू शकते. असामान्य हवामानामुळे त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होणार आहे.

नैसर्गिक आपत्ती: राहू, मंगळ, शनि आणि सूर्य यांच्यामुळे २०२४ मध्ये भारतात नैसर्गिक आपत्ती वाढू शकतात. लोकांना वादळ, चक्रीवादळ, भूकंप आणि पूर यांपासून स्वतःचे संरक्षण करावे लागेल. यावेळी भूकंप आणि चक्रीवादळामुळे जीवित व वित्तहानी होण्याची भीती अधिक आहे.

रोग: भारतात नवीन रोग किंवा नवीन महामारी येण्याची शक्यता आहे. केतूमुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असून त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता राहील. मानसिक तणाव वाढू शकतो. लोकांना आतापासून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करावी लागेल.

राजकीय गोंधळ: २०२४ मध्ये मंगळ, शनि आणि राहूच्या प्रभावामुळे भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक राजकीय गोंधळ उडेल. राजकीय पक्षांमधील वैराची भावना वाढेल. खोटे आरोप, प्रतिआरोप यामुळे द्वेष वाढेल. देशात राजकीय अस्थिरता निर्माण होईल.

महागाई : येत्या काळात महागाई वाढेल कारण अतिवृष्टी, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे देशातील बहुतांश भागातील पिके नष्ट होण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे किंमती वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलचे दरही चढेच राहतील!

भारतीय सीमा: वर्षाच्या मध्यात भारताच्या पश्चिम आणि पूर्व सीमेवर तणाव शिगेला पोहोचेल. भारतावर मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट हे महिने भारतासाठी कठीण असतील. पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात आणखी अशांतता निर्माण होणार आहे. याचा अर्थ भारतात अंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

मग हे वर्ष वाईटच का? : तर नाही, सुख दुःखाचा फेरा सुरूच राहतो. त्यामुळे भयभीत होण्याचे कारण नाही. अशा वाईट प्रसंगातून तरुन जायचे असेल तर आपले सत्कर्म, पूर्वपुण्याई, ईश्वरभक्ती आणि सद्वर्तन कामास येते हे ध्यानात ठेवा आणि वाईटावर चांगल्या स्थितीने मात करण्याचा कायम प्रयत्न करा.