म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 9आषाढी एकादशीच्या महोत्सवात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरंगात न्हाऊन निघतो. त्याचे श्रेय जाते संतांना! ज्यांनी विठूरायाचे सुंदर अभंग लिहून त्याच्या सगुण रूपाची प्रचिती आपल्याला शब्दातून दिली. आषाढीनिमित्त त्याचीच उजळणी शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून करूया. 2 / 9संत चोखामेळा यांचा हा अभंग आहे. त्यात ते भक्तांच्या रंगात रंगून गेलेल्या पांडुरंगाचे वर्णन करत आहेत. हे वर्णन एवढे चित्रमय आहे की आपल्या डोळ्यासमोर ती प्रतिमा तयार झाल्याशिवाय राहत नाही. 3 / 9संत नामदेवांचा हा सुप्रसिद्ध अभंग आहे. यात ते पांडुरंग नामाची तुलना अमृताशी करत आहेत आणि हरिनाम त्याहीपेक्षा गोड आहे, हे स्वानुभवातून सांगत आहेत. हे माहीत असूनही लोक ते का घेत नाहीत असा प्रश्न ते काकुळतीने विचारत आहेत. 4 / 9संत शिरोमणी तुकाराम महाराज समस्त वारकऱ्यांचे मनोगत जणू काही या अभंगातून मांडतात, ज्याच्या दर्शनासाठी आतुर झालो होतो, एवढी पायपीट करून आलो, त्या पांडुरंगाचे नुसते चरण पाहिले, आता आणखी कोणत्याही विषयाकडे मन धावणार नाही असा स्वानुभव ते व्यक्त करतात. 5 / 9संत एकनाथ महाराज म्हणतात, देहरूपाने आमचे अस्तित्त्व दिसत असले तरी आमचा आत्मा विठ्ठल आहे. जो या देहात व्यापून राहिला आहे. देवाला आपलेसे करून घ्यायचे असेल तर एवढी एकरूपता व्हायला हवी, याचा जणू ते आदर्श घालून देत आहेत. 6 / 9संत गोरा कुंभार या अभंगात म्हणतात, देवाच्या सन्निध जायचे असेल तर इतर विषयांची आसक्ती कमी व्हायला हवी. जर देवाप्रती तुमचे प्रेम शुद्ध असेल तर तोच तुम्हाला विषयातून मुक्त करतो आणि देशोधडीला लावतो आणि त्याच्याशी संग जोडून घेतो. 7 / 9माउली अर्थात संत ज्ञानेश्वर लिहितात, जेव्हा भगवंताला प्रत्यक्ष पाहतो, त्याचे दर्शन घेतो, डोळेभरून न्याहाळतो, तेव्हा जे सुख मिळते त्या सुखाची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. हे सुख देणारा पांडुरंग, त्याची गोडी आपल्याला लागली हे आपले भाग्यच समजा. 8 / 9असा हा पांडुरंग अठ्ठावीस युगं आपल्या भक्तांच्या भेटीसाठी कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे आणि ते ध्यान अर्थात ते रूप अतिशय सुंदर दिसत आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. हे रूप बघून कधीही कंटाळा येणार नाही तर रोज हे श्रीमुख आवडीने बघण्याची माझी तयारी आहे. 9 / 9भगवंताकडे काय मागावे? संसारसुख? नाही! ते तर त्याने न मागताच दिले आहे आणि ते कितीही मिळाले तरी अपुरे पडणारे आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता आम्हाला एवढेच दान दे, की तुझा विसर कधीही पडू नये. तुझ्यासमोर मुक्ती, मोक्ष, धन, संपत्ती कवडीमोल आहे. तुझे नामःस्मरण होणार असेल तर कितीही यातना भोगाव्या लागल्या तरी मनुष्य जन्मात वारंवार येण्याची आमची तयारी आहे!