५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:00 IST
1 / 9Viparit Mahalaxmi Rajyog November 2025: नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह आताच्या घडीला स्वराशीत म्हणजेच वृश्चिक राशीत विराजमान आहे. यामुळे रुचक नामक राजयोग जुळून येत आहे. ०७ डिसेंबर २०२५ पर्यंत मंगळ याच राशीत असेल. २० नोव्हेंबर रोजी नवग्रहातील शीघ्र गतीने गोचर करणारा चंद्र ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे.2 / 9सुमारे ५४ तास चंद्र ग्रह वृश्चिक राशीत विराजमान असेल. चंद्र आणि मंगळ यांच्या युतीने महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होती आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना देवी लक्ष्मीकडून विशेष आशीर्वाद मिळू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि त्याचबरोबर संपत्तीत वाढ होऊ शकते.3 / 9१२ नोव्हेंबर रोजी बुध अस्तंगत झाला आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत बुधाचा अस्त वृश्चिक राशीत कायम असणार आहे. यामुळे मंगळ आणि बुधाचा विपरीत राजयोग जुळून आला आहे. महालक्ष्मी राजयोग आणि विपरीत राजयोगाचा यांचा संयोग ५४ तास असणार असल्याचे म्हटले जात आहे. याचा काही राशींना चांगला लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...4 / 9मेष: विपरीत राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. वादविवादातून दिलासा मिळू शकतो. ते त्यांच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात. त्यांना अहंकारापासून मुक्तता मिळू शकते. त्यांच्या जोडीदारासोबत सुरू असलेले कोणतेही वाद आणि मतभेद आता संपू शकतात. यामुळे नात्याला एक नवीन संधी मिळू शकते.5 / 9कन्या: विपरीत महालक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. व्यवसायात जास्त नफा मिळू शकेल. मेहनतीचे आता फळ मिळू शकेल. आत्मविश्वास वाढेल. विचार व्यक्त करण्यात अधिक यशस्वी व्हाल. धैर्य वाढेल. शत्रूंवर विजयी प्राप्त करू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. सरकार आणि प्रशासनाशी संबंधित बाबींमधून फायदा होऊ शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात.6 / 9वृश्चिक: महालक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. संपत्ती वाढेल. आत्मविश्वास आणि धैर्य लक्षणीयरीत्या वाढेल. जीवनात नवीन आनंद येतील. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बचतीच्या योजना अमलात आणण्यात यश मिळू शकेल. हा काळ व्यावसायिक आणि नोकरदार या दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरेल. पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळण्याची दाट शक्यता आहे. 7 / 9धनु: विपरीत राजयोग अनुकूल ठरू शकेल. मंगळ आणि बुध ग्रहाचे विशेष आशीर्वाद मिळू शकतात. आदर, पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. मित्रांसोबत चांगला वेळ घालवतील. या काळात नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर लक्षणीय फायदा होऊ शकतो. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय वेगाने वाढू शकतो. काही प्रवास करावा लागू शकतो, परंतु यामुळे कल्पनेपलीकडे फायदे मिळू शकतात. 8 / 9मकर: महालक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. सरकारी काम, प्रकल्प इत्यादींशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकते. परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजात आदर आणि सन्मान वाढू शकतो. अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकते.9 / 9- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.