शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना फलदायी, करिअर वृद्धीची संधी; परदेशातून लाभ, नोकरीत अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 2:12 PM

1 / 10
सन २०२४ चा मे महिना विशेष ठरणारा आहे. २०२४ मधील सर्वाधिक मोठे आणि महत्त्वाचे ग्रह गोचर मे महिन्यात होणार आहे. धार्मिक, सांस्कृतिकप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना विशेष ठरणारा आहे. मे महिन्यात नवग्रहातील ४ ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. याचा प्रभाव केवळ राशी नाही, तर देश-दुनियेवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे.
2 / 10
०१ मे रोजी नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रह मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर १० मे रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करेल. तर, नवग्रहांचा राजा सूर्य १४ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल.
3 / 10
१९ मे रोजी शुक्र स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या वृषभ प्रवेशानंतर गुरु, सूर्य आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग जुळून येऊ शकेल. तर, ३१ मे रोजी बुध दुसऱ्यांना राशीपरिवर्तन करून मेष राशीतून वृषभ राशीत विराजमान होऊ शकेल. यानंतर वृषभ राशीत गुरु, सूर्य, बुध आणि शुक्र यांचा चतुर्ग्रही योग जुळून येऊ शकेल. तसेच अनेक राजयोग जुळून येऊ शकतील. याचा ७ राशींना करिअर, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक आघाडीवर उत्तम लाभ, फलदायी काळ ठरू शकेल, जाणून घेऊया...
4 / 10
मेष: करिअरच्या दृष्टिकोनातून आगामी काळ अनुकूल ठरू शेकल. भाग्याची साथ मिळू शकेल. एकापाठोपाठ अनेक चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठ अधिकारी प्रगतीवर समाधानी राहतील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. परदेशी स्रोतांकडून पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी सकारात्मक काळ ठरण्याची शक्यता आहे. परदेशात जायचे आहे त्यांनी प्रयत्न सोडू नयेत. खर्चात वाढ दिसून येऊ शकेल.
5 / 10
कर्क: आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. प्रतिभा ओळखून कामे करू शकाल. आव्हानांवर मात कराल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याची संधी प्राप्त करू शकतील. चांगले परिणाम मिळतील. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने चांगले यश देणारा काळ आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगले यश मिळू शकेल. प्रगती होईल.
6 / 10
सिंह: आगामी काळ भाग्यकारक ठरू शकतो. फायदा होईल. बदलीची इच्छा असलेले नोकरदार इच्छित ठिकाणी बदली मिळवू शकतात. जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. जॉब प्रोफाइल सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकता. विविध क्षेत्रात नाव कमवाल.
7 / 10
तूळ: आर्थिक परिस्थिती अनुकूल राहू शकेल. खर्चाचे व्यवस्थापन करण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत बदलाच्या चांगल्या संधी मिळतील. करिअरच्या दृष्टीने अनुकूल परिणाम मिळू शकतील. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो. धार्मिक बाबींमध्ये रस असेल. चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अनुकूल राहतील.
8 / 10
वृश्चिक: आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. कामात जास्त व्यस्त असाल. पूर्ण लाभ मिळेल. वैवाहिक जीवन खूप चांगले राहील. अनेक बाबतीत यश मिळेल. उत्पन्न वाढेल. काही लोक परदेश दौऱ्यावर जाऊ शकतात. चांगले परिणाम मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चांगली बढती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून खूप मदत मिळेल. मोठ्या पदाचा लाभ होईल.
9 / 10
मकर: संयम वाढू शकेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांतता राहील. मालमत्ता खरेदीचे योग येतील. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. धनसंचय करण्यात यश मिळू शकेल. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाचे चांगले फळ मिळू शकेल. व्यवसायातही अनुकूल परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात आनंद राहू शकेल.
10 / 10
मीन: आगामी काळ फलदायी ठरू शकेल. नोकरदार लोकांना चांगल्या कामाचे बक्षीस मिळू शकते. सहकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सकारात्मक असू शकतील. कठोर परिश्रमानंतर चांगले यश मिळू शकेल. अनुभवी लोकांच्या मदतीने व्यवसाय यशस्वी करण्यात यशस्वी व्हाल. सरकारी क्षेत्रात फायदा होऊ शकेल. आर्थिक लाभ होईल. खर्च स्थिर राहतील. उत्पन्नाची पातळी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य