शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

४ राजयोगात २०२६ची पहिली कालाष्टमी: ९ राशींवर महादेव-लक्ष्मी कृपा, चौपट लाभ; कल्याण-मंगल योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:01 IST

1 / 15
2026 First Kalashtami Astrology: इंग्रजी नववर्ष २०२६ सुरू झाले आहे. मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत चतुग्रही योग जुळून आला आहे. धनु राशीतील चार ग्रहांमुळे विविध प्रकारचे चार राजयोग जुळून आलेले आहेत. या चार शुभ राजयोगात शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी कालाष्टमी आहे.
2 / 15
देवाधिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो. शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. दर महिन्यात येणारी कालाष्टमी तिथी ही महादेवाचा अवतार कालभैरव याला समर्पित असते. कालाष्टमी ही काळभैरवाची जन्मतिथी असल्याने दर महिन्यातल्या वद्य अष्टमीला ती साजरी केली जाते.
3 / 15
२०२६ च्या पहिल्या कालाष्टमी तिथीला जुळून आलेल्या ग्रहस्थितीचा काही राशींना चांगला लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: कार्यक्षेत्रातील बदल लाभदायक ठरतील. नोकरी व्यवसायात कामाचा ताण राहील. त्याच जोडीला घरातील कामांसाठीही नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. त्यामुळे दोन्ही आघाड्यांवर सुरुवातीला व्यस्त राहाल. काहींना अचानक मोठी संधी मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. पर्यटनाच्या संधी मिळतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल; मात्र शनिवारी ताण राहील. योजना लोकांना सांगत बसू नका. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा.
5 / 15
वृषभ: शुभ फळे मिळतील. चंद्राचे भ्रमण फायदेशीर ठरेल. व्यवसायात भरभराट होईल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. योजना लोकांना आवडतील. भावंडांशी मधुर संबंध राहतील. मात्र, मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. नोकरीत कामाचा ताण वाढेल. एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. कागदोपत्री पूर्तता करताना दक्षता घ्यावी. घरी पाहुणे मंडळी येतील. चांगले अनुभव येतील.
6 / 15
मिथुन: महत्त्वपूर्ण कामे, धनलाभ, प्रेमातील यश, व्यावसायिक उलाढाली इत्यादी दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. मात्र, आर्थिक निर्णय जपून घ्या. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. कामाचा ताण राहील. विवाहाच्या दृष्टीने चांगला काळ आहे.
7 / 15
कर्क: ओळखीचा फायदा होईल. आघाडीवर राहाल. अडचणी दूर झालेल्या असल्यामुळे हलके वाटेल. मनात नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. मोठ्या आत्मविश्वासाने कामे कराल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. त्यातून कामे होतील. मालमत्तेची कामे करताना बेपर्वाई नको एवढे मात्र लक्षात ठेवा. जवळच्या प्रवासाचे योग येतील, भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी.
8 / 15
सिंह: प्रतिष्ठा वाढेल. अधिक प्रमाणात अनुकूलता जाणवेल. वेळापत्रक फारच व्यस्त राहील. कितीही कामे केली तरी नवनवीन कामे उपस्थित होतील. मनात आध्यात्मिक विचार राहतील. कामे वाढली तरी त्यातून फायदा होणार असल्याने कामाचे काही वाटणार नाही; मात्र वेळेचे नियोजन नीट करा. लोकांना अवास्तव आश्वासने देऊ नका. प्रेमात असणाऱ्यांना गैरसमजांना तोंड द्यावे लागेल. धनलक्ष्मीची कृपा राहील.
9 / 15
कन्या: धनलाभ होईल. कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. नवीन संधी मिळेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. धनलक्ष्मीची प्रसन्नता राहील. हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. नियमानुसार कामे करा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अनुकूल वातावरण राहील. आवडत्या छंदासाठी वेळ देणे शक्य होईल.
10 / 15
तूळ: महत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. पद, प्रतिष्ठा, पगारवाढ, मनासारखे काम मिळणे या दृष्टीने अनुकूल फळे मिळतील. सुख-सोयी वाढवून मिळतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. यशस्वीपणे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. मात्र व्यवहारात सतर्कता बाळगली पाहिजे. कायद्याची बंधने पाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा.
11 / 15
वृश्चिक: शुभ फळे मिळतील. चंद्र भ्रमणाने अनेक उत्तम लाभ होतील. विदेश यात्रा सफल होतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल, सामाजिक मान-सन्मान मिळेल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल, तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. नोकरीत अचानक बदल होऊ शकतात. सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. महत्त्वाची कामे होतील, थनलाभ होईल.
12 / 15
धनु: अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र, थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. वाहने जपून चालवा, तरुण-तरुणींना विवाह जुळण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. परीक्षा देणाऱ्यांना सफलता मिळेल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. मनात सकारात्मक विचार राहतील. व्यवसायात धाडसी निर्णय घेण्याकडे कल राहील.
13 / 15
मकर: भेटवस्तू मिळतील. मनात सकारात्मक विचार राहतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे सांगून येतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. संयमाने वागण्याची गरज आहे. इतरांच्या भानगडीत पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. वाहने जपून चालवा. अनुकूल वातावरण राहील. लोक मान देतील. चैनीवर खर्च कराल.
14 / 15
कुंभ: संमिश्र ग्रहमान राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. जुनी येणी वसूल होतील. मात्र, योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. भेटवस्तू मिळतील. नोकरीत महत्त्व वाढेल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. वाहने हळू चालवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
15 / 15
मीन: योजना गुप्त ठेवा. नोकरी, व्यवसाय, गृहसौख्य, शैक्षणिक यश, वैवाहिक सौख्य इत्यादी बाबतीत अनुकूलता अनुभवायला मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सफलता मिळेल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. योजना लोकांना सांगू नका. आहाराचे पथ्य पाळा. परिस्थिती आटोक्यात येईल. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यLord Shivaमहादेवspiritualअध्यात्मिक