शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२१ मध्ये 'या' सहा राशींना मिळेल करिअर आणि व्यवसायात घवघवीत यश!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 05, 2021 12:25 PM

1 / 6
या राशीचे लोक मूळातच अतिशय उत्साही आणि कल्पक असतात. या वर्षभरात तुम्हाला व्यवसायसंबंधित आणखी नवनवीन कल्पना सुचतील व त्या प्रत्यक्षातदेखील येतील. त्याचा परिणाम निश्चितच तुमच्या व्यवसायावर होईल आणि या सकारात्मकतेमुळे तुमचे वर्ष आनंदाचे जाईल व आर्थिक भरभराट होईल.
2 / 6
या वर्षात तुमची आर्थिक उन्नती होईल, तसेच व्यवसाय वाढीच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल असेल. २०२० मध्ये तुमच्या वाट्याला घोर निराशा आली असेल, तर तयार राहा कारण, गेल्या वर्षीची कसर भरून निघेल, एवढे यश या वर्षभरात तुम्ही संपादन करू शकाल. तसेच एखादी अनुभवी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभेल. त्यांच्याकडून नम्रपणे व्यावसायाशी निगडित बाबी समजून घेतल्यात, तर हे वर्षच काय तर आयुष्यभरासाठी त्यांचे शब्द तुमच्या कामी येतील. नवा व्यवसाय सुरू करायचा असल्यास विंâवा व्यवसायाचा विस्तार वाढवायचा असल्यास हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम आहे.
3 / 6
या वर्षी तुम्ही नोकरी व्यवसायाचा उत्तम समतोल साधू शकाल. शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांचे बळ तुमच्या राशीला लाभणार आहे. नोकरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित असलेल्या यशाचा आलेख उंचावणारा ठरेल. जे लोक या वर्षी एखादा व्यवसाय नव्याने सुरू करणार असतील, त्यांनाही हळू हळू व्यवसायात पाय रोवून उभे राहता येईल. योग्य दिशेने मेहनत, एकाग्रता आणि चिकाटीने काम केलेत, तर तुम्हाला भरघोस यश मिळू शकणार आहे.
4 / 6
या राशीचे जातक बोलण्यात सडेतोड आणि व्यवहारात सक्षम असतात. नवनवीन जोखीम पत्करण्याची तयारी दर्शवतात. मात्र, या वर्षभरात तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने सावधतेने आणि विचारपूर्वक पावले उचललीत, तर तुम्हाला हमखास यश मिळेल. मात्र, एक चुकीचा निर्णय व्यवसायाला घातक ठरू शकेल. यासाठीच अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या, सहकार्य घ्या आणि सावधतेने निर्णय घेत काम करा. यशाचे शिखर गाठण्याची ताकद तुमच्याठायी आहे आणि ग्रहस्थितीदेखील तुम्हाला अनुकूल आहे.
5 / 6
या राशीचे लोक त्यांच्या राशीच्या चिन्हाप्रमाणे आपल्या लक्ष्यावर अचूक निशाणा धरतात. त्यानुसार हे वर्ष तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम आहे. तुम्हालादेखील शनि आणि गुरुचे पाठबळ मिळणार असल्यामुळे विलंबित कार्य मार्गी लागेल. या वर्षभरात तुम्हाला व्यवसायाशी संबंधित विश्वासू सहकारी भेटेल. त्याच्या साथीने तुम्ही व्यवसायाचा आलेख उंचावण्यात यशस्वी व्हाल. तसेच नवीन कल्पना साकारू शकाल.
6 / 6
या राशीचे लोक आपल्या कर्तव्याप्रती अतिशय दक्ष असतात. तसेच चौकटीबाहेर जाऊन विचार करतात. सर्व प्रकारच्या शक्यता आजमावून पाहतात. या प्रयोगशीलतेमुळे ते नोकरी व्यवसायात तग धरून राहतात. या वर्षभरात तुम्ही घरगुती व्यवसायाला थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊ शकाल. तुम्ही जे ठरवाल, ते प्रत्यक्षात घडेल. कारण, तुमच्या बाजूने ग्रहस्थिती अनुकूल आहे. व्यवसायात मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत. यासाठी तुम्ही कटिबद्ध रहा.