शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

१६ दिवस कालसर्प योग २०२६: ‘या’ मूलांकांना चौपट लाभ, चौफेर यश-प्रगती; राहु-केतु हवे ते देतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 20:26 IST

1 / 12
Numerology Kaal Sarp Yog 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये कालसर्प दोष हा अत्यंत हानिकारक योग मानला गेला आहे. असे म्हणतात की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा कालसर्प दोष तयार होतो. त्या व्यक्तीला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात, तेव्हा कालसर्प योग तयार होतो.
2 / 12
Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
3 / 12
Kaal Sarp Yog 2026 Numerology: आताच्या घडीला कुंभ राशीत राहु आहे आणि सिंह राशीत केतु आहे. मार्च २०२६ मध्ये १६ दिवस कालसर्प योग जुळून येत आहे. मूलांक ४ चा स्वामी राहु आणि मूलांक ७ चा स्वामी केतु आहे. कालसर्प स्थितीचा सर्व मूलांकांवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवनात दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर नफा कमवण्याची संधी मिळू शकेल. जास्त विचार केल्याने थकवा जाणवू शकतो. अस्वस्थता कमी करण्यासाठी योगासने आणि ध्यान-धारणा करा. प्रेम संबंधांसाठी काळ चांगला ठरू शकतो.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. अत्यंत शुभ काळ ठरू शकतो. नशिबाची भरपूर साथ मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. इच्छित ठिकाणी नोकरी शोधण्याची संधी मिळू शकेल.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कामाचा ताण जास्त असू शकतो. करिअर आणि आर्थिक जीवनात फायदेशीर काळ ठरू शकतो.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. वागण्यात सकारात्मक बदल जाणवतील. बोलण्यामुळे समाजात वेगळे स्थान मिळू शकेल. उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होऊ शकतात.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. कौटुंबिक जीवनात जबाबदाऱ्या समजतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये आदर वाढेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळू शकते. वैवाहिक जीवनातील विद्यमान समस्या दूर होऊ शकतात.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. खूप आनंददायी काळ असू शकतो. मेहनतीचे फळ मिळू शकेल. नशिबाची साथ लाभू शकेल. परिस्थिती सकारात्मक होऊ शकेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात, ज्यामुळे त्यांच्या प्रेम जीवनाला गती मिळेल. कुटुंबासाठी पुरेसा वेळ देऊ शकाल. अनेक मानसिक समस्यांपासून मुक्तता मिळेल.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. जीवनाचा आनंद घेऊ शकाल. धावपळीच्या काळात, स्वतःसाठी वेळ मिळेल. एखाद्या हिल स्टेशनलाही भेट देऊ शकता. सर्जनशीलता सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवून देऊ शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक