१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:27 IST2025-09-20T14:12:54+5:302025-09-20T14:27:02+5:30

Sarvapitri Amavasya 2025 Numerology: सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण असले, तरी काही अत्यंत शुभ योगांचा सर्वोत्तम लाभ काही मूलांकांना मिळू शकतो, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Sarvapitri Amavasya 2025 Numerology: रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. पितृपक्षाची सांगता होईल. २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर सर्वपित्री अमावास्या असणार आहे. विशेष म्हणजे सर्वपित्री अमावास्येला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे. परंतु, हे सूर्यग्रहण रात्री लागणार असल्यामुळे भारतातून दिसणार नाही. पितृपक्षात जमले नाही, तर सर्वपित्री अमावास्येला पूर्वजांचे स्मरण करून श्राद्ध, तर्पण विधी अवश्य करावा, असे सांगितले जाते.

Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.

ग्रहांच्या गोचरामुळे १०० वर्षांनी सर्वपित्री अमावास्येला शुभ योग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. याचा अनुकूल, सकारात्मक प्रभाव काही मूलांकांवर पडू शकतो. उत्तम संधी, यश-प्रगती, धनलक्ष्मीची कृपा, गुंतवणुकीतून भरघोस लाभ मिळू शकतो, असे सांगितले जाते. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. प्रवासात सतर्क राहावे. स्वतःच्या अपेक्षा दुसऱ्यांवर थोपवू नका. संयम राखा. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. परदेशी जाण्याचे योग जुळून येतील. कार्यक्षेत्रात यश मिळेल. आर्थिक आघाडीवर कठोर परिश्रमानंतरच यथोचित फळ मिळू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. कुटुंब, मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. नवीन मित्र बनू शकतील. जवळच्या मित्रामुळे एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागू शकेल. अचाट साहस करायला जाऊ नका. कार्यक्षेत्रात अनुकूलता लाभू शकेल. आर्थिक आघाडीवर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखणे हिताचे ठरू शकेल. एखादे सरप्राइज मिळू शकते. कालांतराने परिस्थिती अनुकूल होऊ शकेल. एखाद्या अडचणीत वरिष्ठांची मदत घ्यावी. आर्थिक आघाडीवर अनुकूलता लाभेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. गुंतवणुकीतून भरघोस लाभ मिळू शकतो.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. अनुकूलता लाभू शकेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील. करिअरमध्ये यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. चांगल्या बातमीमुळे कुटुंबात आनंद पसरेल. कार्यक्षेत्रात कामे पूर्ण झाल्याने मानसिक शांतता लाभेल. सकारात्मक परिणाम मिळतील. मन प्रसन्न होईल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. आत्मविश्वासाने कामे करा. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. प्रतिष्ठा मलिन होऊ शकते. व्यवसायात नवीन सुरुवात जीवनात आनंद आणि समृद्धी आणू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प यशस्वी होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आर्थिक आघाडीकडे लक्ष देणे हिताचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळा.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. कौतुक होऊ शकेल. करिअरमध्ये यश मिळेल. व्यवसायात वृद्धी होऊ शकेल. उत्पन्न वाढू शकेल. अडकलेले पैसे मिळू शकतील. नवीन योजना आखाल. परंतु, महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करताना विचार करावा. ताण-तणाव कमी होईल.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. नोकरीत कामावर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम मिळू शकतील. एखाद्या गोष्टीवरून कुटुंबात तणाव राहू शकतो. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीमुळे करिअरला नवी दिशा मिळू शकेल. प्रवासात सतर्क राहावे. आर्थिक बाबींसाठी अनुकूल काळ राहील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायातील गुंतवणूक नफा मिळवून देऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. नवीन मित्र होतील. शांत आणि संयमाने कामे करावीत. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी संपर्कात येऊ शकाल. आर्थिक आघाडीवर लक्ष द्यावे. अनावश्यक खर्च टाळावेत. विवेकाने घेतलेले निर्णय हिताचे ठरू शकतील. आनंदाची बातमी मिळू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. धनलक्ष्मीची कृपा राहू शकेल. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. कोणत्याही वादात पडू नये. कोणालाही शब्द देऊ नये. मित्रांमुळे समस्येतून बाहेर पडू शकाल. कुटुंबाला प्राधान्य देणे हिताचे ठरू शकेल. अन्यथा कुटुंबात कलह होऊ शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.