शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Santosh Deshmukh Case : जवळच्या व्यक्तीनेच घात केला, देशमुखांचं लोकेशन सांगणारा गावचाच निघाला; अंत्यविधीलाही उपस्थित होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:18 IST

1 / 10
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज मुख्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आज पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही अटक केली.
2 / 10
आरोपींना सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा कोणतर गावचाच असणार असा संशय पोलिसांना होता. पोलिसांच्या तपासात मस्साजोग गावचा रहिवासी असलेला सिद्धार्थ सोनवणे याचे नाव समोर आले.
3 / 10
ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर दोन दिवस सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोग मध्येच उपस्थित होता. तो सरपंच यांच्या अतंयविधीमध्ये सहभागी झाला होता. पोलिसांनी ज्यावेळी आरोपींचा शोध सुरू केला, तेव्हा अचानक सिद्धार्थ फरार झाला.
4 / 10
तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते. काल सिद्धार्थला बीड पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले.
5 / 10
सिद्धार्थ सोनवणे हा आरोपींना सरपंच संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देत होता. त्याला एका ऊसाच्या गाडीवरुन पोलिसांनी काल ताब्यात घेतले.
6 / 10
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता. मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केलेले होते.
7 / 10
पोलिसांना पहिल्या दिवसापासून गावातीलच जवळचा व्यक्ती देशमुख यांची माहिती आरोपींना पुरवत असेल हा संशय होता. पोलिसांनी याचा तपास सुरू केला, याची माहिती सिद्धार्थला मिळताच त्याने गाव सोडले होते. फोनही बंद केला होता.
8 / 10
सिद्धार्थ सोनवणे गावातून फरार झाल्यानंतर त्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सिद्धार्थ हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना झाली.
9 / 10
सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता. त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना त्याचे मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ठिकाणी त्यांनी सापळा लावला. एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
10 / 10
दरम्यान, आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. आता या गुन्ह्यातील माहिती उघड होणार आहे. ही हत्या का केली, या मागचे खरे कारण काय आहे याबाबतचा तपास होऊ शकतो.
टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीwalmik karadवाल्मीक कराड