लिपस्टिकच्या कलरवरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 18:00 IST2019-02-01T17:53:52+5:302019-02-01T18:00:58+5:30

ज्याप्रकारे तुमच्या आवडी-निवडीवरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत काही गोष्टी समजण्यासाठी मदत होते, त्याचप्रमाणे तुमच्या लिपस्टिकचा कलरही तुमच्या व्यक्तीमत्त्वाबाबत अनेक गोष्टी सांगण्यास मदत करतो. लिपस्टिक लावताना तुम्ही कोणता रंग निवडता त्यापासून ते कोणता लिप कलर तुम्हाला आवडतो आणि कोणता आवडत नाही यावरूनही तुमच्याबाबत अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. जाणून घेऊया तुमच्या फेवरेट लिपस्टिक शेड तुमच्या व्यक्तीमत्त्वाबाबत कोणत्या गोष्टींचा खुलासा करत आहेत त्याबाबत...
डीप रेड कलर
रेड कलर आणि रेड कलरच्या वेगवेगळ्या शेड्सच्या लिपस्टिक्स आवडणाऱ्या तरूणी आणि महिला अतिशय हुशार असतात. तसेच त्या उत्साहीदेखील असतात. त्यांचं व्यक्तीमत्व दिलखुलास असण्यासोबतच प्रभावीदेखील असतं. त्याचबरोबर त्यांच्या मनात कोणाहीबाबत राग किंवा द्वेष असत नाही. तुमच्याही कदाचित एक गोष्ट लक्षात आली असेल की, रेड कलरची लिपस्टिक लावणाऱ्यांकडे आपोआप आपलं लक्षं आकर्षित होत असतं.
पिंक कलर
पिंक म्हणजेच गुलाबी रंग नेहमीच गर्ली कलर म्हणून ओळखला जातो. अशा मुली किंवा महिला ज्या पिंक कलरची लिपस्टिक लावतात. त्या मनाने फार चांगल्या असतात. हा रंग क्यूटनेससाठीही ओळखला जातो. त्याचबरोबर गुलाबी रंग आवडणाऱ्या मुली व्यवस्थित, संवेदनशील आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह असतात.
ब्राउन कलर
प्लम किंवा ब्राउन कलरच्या लिपस्टिकचा शेड आवडणाऱ्या महिला आणि तरूणींना स्पष्ट गोष्टींचा फार कंटाळा येतो. यांना परिस्थितीशी दोन हात करायला आवडतं. तसेच या मुली फार रहस्यमयी असून इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.
न्यूड कलर
न्यूड कलरची लिपस्टिक आवडणाऱ्या महिला आणि मुली फार सिंपल, पारदर्शी आणि डाउन टू अर्थ असतात. त्यांना असं वाटतं की, लाइट मेकअपमध्येच त्या फार सुंदर दिसतात. अशा मुली फार शांत आणि ईजी-गोइंग असतात. यांना आपला नॅचरल लूक आवडतो.
पर्पल कलर
लिपस्टिक्सच्या इतर रंगांपेक्षा हा रंग फार वेगळा आणि सहजासहजी हा रंग कोणी वापरताना दिसत नाही. कारण लिपस्टिक शेड्समधील ही एक हटके आणि बोल्ड चॉइस समजली जाते. परंतु ज्या मुली आणि महिला पर्पल कलरची लिपस्टिक लावतात. त्यांना नियम तोडायला फार आवडतं. एवढचं नव्हे तर या मुलींना लाइफमध्ये रिस्कचा सामना करायाला फार आवडतं.