शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पावसाळ्यात त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 3:15 PM

1 / 9
पावसाळा सुरू झाला असून अनेक लोक पावसामध्ये व्हेकेशन टिप्सचा किंवा भिजण्याचा आनंद घेत आहेत. पावसाने प्रखर उन्हाळ्यापासून सुटका केली असली तरिही याचा अर्थ असा होत नाही की, तुमची त्वचा सुरक्षित आहे. पावसाळ्यातही त्वचेची खास काळजी घेणं आवश्यक असतं. कारण पावसाळाही आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येत असतो.
2 / 9
अनेक लोक पावसाळ्यामध्ये पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे या वातावरणात तुम्हाला त्वचेची खास काळजी घेणं आवश्यक ठरतं. जाणून घेऊया पावसाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी असणाऱ्या काही खास टिप्स...
3 / 9
पाऊस किंवा थंड वातावरणाचा असा अजिबात अर्थ घेऊ नका की, आता तुम्हाला सनस्क्रिनची गरजेचं नाही. त्वचेच्या कोणत्याही समस्येपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रिनचा वापर करा
4 / 9
चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि घाण दूर करण्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा आपला चेहरा स्वच्छ करा. त्यामुळे फंगल इन्फेक्शपासून दूर राहता.
5 / 9
आपल्या शरीरातून टॉक्सिन्स दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका होण्यास मदत होईल.
6 / 9
बाजारामध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त ब्युटी प्रोड्क्ट्सऐवजी घरगुती उपायांचावापर करा.
7 / 9
कमीतकमी मेकअप करा. कारण जास्त मेकअप केल्यामुळे तुमचे स्किन पोर्स बंद होऊ शकतात. यामुळे ब्रेकआउट्स होऊ शकतात. जर तुम्ही मेकअप करत असाल तर झोपण्यापूर्वी व्यवस्थित स्वच्छ करा.
8 / 9
पावसाळ्यामध्ये शक्यतो तळलेल्या पदार्थांपासून दूर रहा. त्यामुळे त्वचेचं आरोग्य राखण्यास मदत होते.
9 / 9
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलBeauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी