पुरूषांसाठी खास ब्युटी टिप्स; एकदा वापरून पाहा अन् कूल दिसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 11:28 IST2019-07-08T11:18:58+5:302019-07-08T11:28:28+5:30

दिवसभर ऊन आणि प्रदूषणामध्ये राहिल्यानंतर फक्त महिलाच नाही तर पुरूषांच्याही त्वचेचा उजाळा नाहीसा होतो. अशातच टॅनिंग आणि प्रदूषण दोन्हींमुळे त्वचेला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करणं शक्य असतं.
बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये असलेले केमिकल्स त्वचेसाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे घरगुती उपाय करणं अनेकदा फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया फ्रेश आणि कूल लूक मिळवण्यासाठी पुरूषांसाठी काही घरगुती टिप्स...
बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसामध्ये ब्लिचिंग एजंट असतात. जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तुम्ही शक्य असेल तर बटाट्याचा रस काढून त्वचेवर लावू शकता. तसेच बटाट्याच्या पातळ स्लाइस कापून तुम्ही त्वचेवर मसाज करू शकता.
स्ट्रॉबेरी आणि दूध
त्वचेला फ्रेश लूक देण्यासाठी आणि टॅनिंग दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि दूध एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यासाठी स्ट्रॉबेरी स्मॅश करून घट्ट पेस्ट तयार करा. त्यामध्ये ताजी क्रिम एकत्र करा. तयार पेस्ट 20 मिनिटांसाठी त्वचेवर लावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
हळद
आयुर्वेदामध्येही त्वचेला होणाऱ्या हळदीच्या फायद्यांबाबत सांगण्यात आले आहे. त्वचेच्या सर् समस्या दूर करण्यासाठी हळद अत्यंत फायदेशीर ठरते. त्यासाठी थोड्याशा दूधामध्ये 2 चमचे हळद एकत्र करा आणि आठवड्यातून किंमान तीन वेळा अर्ध्या तासासाठी चेहऱ्यावर लावा.
कोरफड
कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्वचेवरील टॅनिंग, ड्रायनेस यांसोबतच सेंसिटिव्ह स्किनची समस्याही दूर करण्यासाठी कोरफड मदत करते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.